21 November 2019

News Flash

सारा- कार्तिकचं ब्रेकअप? काय आहे कारण…

चाहत्यांसाठी हा धक्काच आहे

बॉलिवूडमधील सध्याच सर्वात क्यूट कपल म्हणून अभिनेत्री सारा आली खान आणि कार्तिक आर्यनकडे पाहिले जाते. दोघांची जोडी चाहत्यांच्या चांगलीच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच साराचे वडिल अभिनेता सैफ अली खानने कार्तिक आर्यनची प्रशंसा करत तो चांगला मुलगा असल्याचे म्हटले होते. पण आता कार्तिक आणि साराचा ब्रेकअप झाला असल्याचे म्हटले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्तिक आणि साराचा ब्रेकअप खासगी कारणाने नव्हे तर प्रोफेशनल कारणामुळे झाला असल्याचे म्हटले आहे. दोघेही चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये इतके व्यग्र आहेत की त्यांना एकमेकांना वेळ देणे शक्य होत नाही. म्हणून सारा आणि कार्तिकने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

आणखी वाचा : दोन लाखांची जीन्स? साराचा फोटो पाहून तुम्हीच ठरवा…

सध्या कार्तिक आणि सारा करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. नुकताच कार्तिकचा आगामी चित्रपट ‘लव आजकल २’चे चित्रीकरण पूर्ण झाले आणि त्याने त्याच्या पुढचा प्रोजेक्ट ‘पति पत्नी औऱ वो’ला सुरुवात केली आहे. तर सारा ‘कुली नंबर १’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये व्यग्र आहे. त्यांच्या व्यग्र वेळापत्राकामुळे त्यांना एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे ब्रेकअप झाला असल्याचे म्हटले जात आहे. तसेच दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे असल्याचे म्हटले जात आहे.

First Published on October 18, 2019 11:02 am

Web Title: sara ali khan and kartik aaryan call it quits avb 95
Just Now!
X