03 March 2021

News Flash

Photos : ‘वोग’ मासिकासाठी साराचं हॉट फोटोशूट

तरुणाईच्या आवडत्या अभिनेत्रींमध्ये साराने तिचं स्थान पक्क केलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

सारा अली खान

सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खानचं स्टारडम आज एखाद्या यशस्वी कलाकाराइतकंच आहे. साराने बॉलिवूडमध्ये फक्त दोनच चित्रपट केले आहेत. पण पदार्पणापासून नेहमीच ती चर्चेत राहिली आहे. ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ चित्रपटांतील तिच्या अभिनयाने प्रेक्षक प्रभावित झाले. तर सोशल मीडियावरही तिच्या चाहत्यांची संख्या वाढू लागली. तिच्या प्रसिद्धीची दखल नावाजलेल्या ‘वोग’ या मासिकानेही घेतली. या मासिकासाठी साराने नुकतंच फोटोशूट केलं असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोशूटमधील साराचा हॉट अंदाज तरुणांना घायाळ करत आहे.

‘बीच’ अर्थात समुद्रकिनारा या थीमवर आधारित साराचं फोटोशूट होतं. साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले असून अल्पावधीतच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सार्वजनिक ठिकाणी तिचा बिनधास्त वावर, मुलाखतींमध्ये मोकळेपणाने बोलणं चाहत्यांना फार आवडत आहे. तरुणाईच्या आवडत्या अभिनेत्रींमध्ये साराने तिचं स्थान पक्क केलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

सध्या सारा तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत झळकणार आहे. हा चित्रपट ‘लव्ह आज कल’चा सीक्वल असल्याचं म्हटलं जात आहे. सारा-कार्तिकची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहतेसुद्धा उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 2:59 pm

Web Title: sara ali khan sizzles on the beach in vogue photoshoot
Next Stories
1 वरुणच्या चाहतीने गर्लफ्रेंडला जीवे मारण्याची दिली धमकी; घराबाहेर घातला राडा
2 Video : विकी कौशलच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत वरुण धवनचा ‘फर्स्ट क्लास’ डान्स
3 ‘मोदींच्या बायोपिकला झुकतं माप’, प्रसून जोशींच्या राजीनाम्याची मनसेची मागणी
Just Now!
X