24 November 2020

News Flash

“माझ्यासोबत फसवणूक झाली”; ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

Big Boss14 : पहिल्याच आठवड्यात ‘ही’ अभिनेत्री घराबाहेर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. हा शो सुरु होऊन आता दोन आठवडे उलटून गेले आहेत. शोमधील प्रत्येक स्पर्धक मोठ्या जिद्दीने ‘बिग बॉस’च्या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अभिनेत्री सारा गुरपाल हिला मात्र शोमध्ये दिर्घ काळ टिकून राहता आलं नाही. पहिल्याच आठवड्यात ती ‘बिग बॉस’मधून अ‍ॅलिमिनेट झाली आहे. शोमधून बाहेर पडताच तिने घरातील इतर स्पर्धकांवर निशाणा साधला. “प्रेक्षकांनी नाही तर घरातील काही स्वार्थी स्पर्धकांनी मला एलिमिनेट केलं” असा आरोप तिने केला आहे.

अवश्य पाहा – एकाच वेळी ‘ती’ दोघांना करत होती डेट; ‘बिग बॉस’मध्ये झाला डबल डेटिंगचा भांडाफोड

साराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. “बिग बॉसमध्ये माझ्यासोबत जे घडलं ते योग्य नव्हतं. मला प्रेक्षकांनी नाही तर घरातील स्वार्थी स्पर्धकांनी एलिमिनेट केलं. खरं तर मी खूप छान खेळत होते. प्रत्येक टास्कमध्ये मी भाग घेतला. घरातील प्रत्येक काम मी काळजीपूर्वक करत होते. बिग बॉसच्या घरात मी आणखी काही दिवस राहावं अशी प्रेक्षकांची इच्छा होती. परंतु घरातील काही लोकांना माझी भीती वाटत होती त्यामुळे त्यांनी मला बाहेर काढलं. मला त्यांनी दगा दिला.” अशा आशायाची वक्तव्य करत साराने आपली नाराजी व्यक्त केली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – माधुरीला वाचवण्यासाठी आमिताभ-गोविंदा यांनी गुंडांसोबत केली होती फाईट; पाहा व्हिडीओ…

शोमधील इतर सर्व स्पर्धकांनी मिळून साराविरोधात मतदान केलं. त्यामुळे तिला ‘बिग बॉस’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सारा सोशल मीडियाद्वारे सतत चर्चेत असते. परंतु ‘बिग बॉस’च्या घरात मात्र ती इतर कलाकारांना तुल्यबळ स्पर्धा देऊ शकली नाही. पहिल्या दिवसापासूनच तिच्याविरोधात वातावरण तयार झालं होतं. टास्कमध्येही इतर स्पर्धकांनी तिला बाजूला सारलं. परिणामी चांगला खेळ सादर न केल्यामुळे साराला ‘बिग बॉस’मधून अ‍ॅलिमिनेट करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 4:00 pm

Web Title: sara gurpal first reaction after out from bigg boss mppg 94
Next Stories
1 दिग्दर्शकाच्या ‘त्या’ वागणुकीनंतर बॉलिवूडकडे पाठ फिरवली; रुबीना दिलैकने सांगितला धक्कादायक अनुभव
2 ‘द व्हाइट टायगर’ : पहिल्यांदाच राजकुमार राव- प्रियांका चोप्रा एकत्र; देसी गर्ल साकारणार ‘ही’ भूमिका
3 ‘मेरे साई’ मालिकेत झळकणार अभिनेत्री शिल्पा तुळसकर
Just Now!
X