News Flash

‘ससुराल सिमर का २’ मालिकेतील अभिनेता करोना पॉझिटिव्ह

'ससुराल सिमर का २' ची संपूर्ण कास्ट ही आग्रामध्ये मालिकेचे चित्रकरण करत होती.

(Photo credit : Rajev Paul Instagram)

संपूर्ण देश करोनाच्या विळख्यात अडकला आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांची आणि मृतांची संख्या ही वाढत आहे. सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांवर याचा परिणाम होतं आहे. अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाली. आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ससुराल सिमर का २’ मध्ये गिरीराज ओसवालची भूमिका साकारणाऱ्या राजीव पॉलची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राजीवने ही माहिती दिली आहे.

इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्टकरत राजीवने करोना झाल्याची माहिती दिली आहे. आग्रा ते मुंबई फ्लाईटने आल्यानंतर त्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. “मी ३० तारखेला आग्राहून मुंबईला आलो. ४ तारखेला मला ताप आला आणि मी लगेच डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांनी मला होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला आणि सोबतच त्यांनी मला काही औषध घेण्यास सांगितले. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह असली तरी मी फिट आहे. काळजी घेण्यासारखं काही नाही. स्वत:ची काळजा घ्या आणि संपूर्ण जग यातून लवकरच बाहेर पडले याची प्रार्थना करा,” अशा आशयाचे कॅप्शन देत त्याने एक फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajev Paul (@rajevpaul)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajev Paul (@rajevpaul)

दरम्यान, ‘ससुराल सिमर का २’ या मालिकेची संपूर्ण स्टार कास्ट ही आग्रामध्ये चित्रीकरण करत होती. या मालिकेचा पहिला एपिसोड हा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. तर ही मालिका ‘ससुराल सिमर का’ या मालिकेचा दुसरा भाग आहे. या मालिकेत दिपिका कक्कर, अविनाष मुखर्जी, तान्या शर्मा आणि करण शर्मा मुख्य भूमिका साकारत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 6:31 pm

Web Title: sasural simar ka 2 actor rajev paul tests positive for covid 19 dcp 98
Next Stories
1 शोकसभेत रडण्यासाठी चंकी पांडेला देण्यात आलेली ५ लाख रुपयांची ऑफर
2 जॅकलीन फर्नांडीसने केली मुक्या प्राण्यांची मदत
3 आलिया भट्टने शेअर केले मेन्टल हेल्थ हेल्पलाइन नंबर ; म्हणाली, “हा कठिण काळ सुरूये…”
Just Now!
X