शाहरुख खान बॉलिवूडचा बाहशहा म्हणून ओळखला जातो. या बादशहाचे जगभरात कोट्यवधी चाहते आहे. शाहरुखची एक झलक पहायला मिळावी ही त्याच्या कित्येक चाहत्यांची इच्छा असते. यासाठी ते वाट्टेल ते प्रयत्नही करत असतात. त्याच्या याच लोकप्रियतेचा प्रत्यय नुकताच चीनच्या विमानतळावर पाहायला मिळालं. त्यामुळे केवळ भारतातच नाही तर चीनमध्ये देखील त्याची तितकीच लोकप्रियता असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे शाहरुखच्या चीनमधील चाहत्यांनी त्याचं खास पद्धतीने स्वागत केल्याचं पाहायला मिळालं.

बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट दाखविला जाणारा होता. या चित्रपटाला भारतीय प्रेक्षकांची पसंती मिळाली नसली तरी चीनमध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थित राहण्यासाठी शाहरुख चीनमधील बीजिंगला पोहोचला. यावेळी शाहरुखला विमानतळावर पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला विमानतळावरच घेरलं. अनेकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी त्याचे ऑटोग्राफही घेतले.विशेष म्हणजे काही चाहते तर त्याच्या नावाचे मोठे पोस्टर्स हातात घेऊन एअरपोर्टवर त्याची वाट पाहत उभे होते.

शाहरुख येताच या सगळ्या फॅन्सनी त्याच्या नावाने ओरडायला आणि टाळ्या वाजवायला सुरुवात केली. शाहरुखनंही त्याच्या या सगळ्या चीनी फॅन्सनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्याच्या अंदाजात आभार मानले. ‘बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी माझ्या चित्रपटाची निवड केली ही माझ्यासाठी प्रचंड आनंदाची बाब आहे. हा चित्रपट आम्हा सगळ्यांसाठी फार स्पेशल आहे. चीनमधील प्रेक्षकांना चित्रपट नक्की आवडेल अशी मला खात्री आहे ‘ अशा भावना शाहरुखनं मीडियाशी बोलताना व्यक्त केल्या.

 

View this post on Instagram

 

What a sweet welcome in Beijing.. thank you

A post shared by Pooja Dadlani (@poojadadlani02) on

चित्रपटासाठी शाहरूनं खूपच मेहनत घेतली होती. शाहरूख एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळला . चित्रपटात वीएफएक्सही वापरले होते तंत्रज्ञान वापराच्या बाबतीत हा चित्रपट सरस ठरला असला तरी चित्रपटाचं कथानक मात्र प्रेक्षकांना फारसं आवडलं नाही. शाहरूखच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत ‘झिरो’ कमाईच्या तुलनेतही मागे पडला होता.