11 July 2020

News Flash

शाहरुख आणि राजकुमार हिरानी पहिल्यांदाच करणार एकत्र चित्रपट?

'झिरो' चित्रपटानंतर शाहरुखला पुन्हा रुपेरी पडद्यावर बघण्यासाठी चाहते उत्सुक

जेव्हा बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार एकत्र येतात तेव्हा तो चित्रपट विशेष गाजतो. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान व सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी लवकरच एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. ‘झिरो’ चित्रपटानंतर शाहरुखला पुन्हा रुपेरी पडद्यावर बघण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. ‘झिरो’ने बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाई केली नव्हती पण तरीही शाहरुखचे चाहते मात्र कमी झालेले नाहीत.

‘मिड डे’च्या वृत्तानुसार शाहरुख खान व राजकुमार हिरानी यांच्यामध्ये एका प्रेमकथेवर चर्चा सुरु आहे. प्रेमकथा हा शाहरुखचा अत्यंत जवळचा विषय आहे. या प्रोजेक्ट संबंधीचे अधिक तपशील सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. पण, गेल्या काही महिन्यात हे दोघे अनेकदा भेटले असून लवकरच ते या प्रोजेक्टची घोषणा करतील. या प्रोजेक्टसाठी विधु विनोद चोप्रा यांच्यासोबत हिरानी एकत्र येणार नसून ते स्वतःच्या बॅनरखाली हा प्रोजेक्ट करण्यात असल्याचं सांगण्यात येतंय. याआधी राजकुमार हिरानी यांच्या ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस’, ‘३ इडियट्स’ या चित्रपटांमध्ये शाहरुख दिसणार होता. आता अखेर हे दोघे एकत्र येतील असं दिसतंय.

या प्रोजेक्टच्या अधिकृत घोषणेसाठी शाहरुखचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. चीनमध्ये असताना शाहरुखने असे सांगितले होते की, जूनमध्ये तो त्याच्या पुढील चित्रपटाविषयी सांगणार आहे. बुधवार, दिनांक ५ जून रोजी शाहरुखने ‘मन्नत’वर ईद साजरी केली. या सेलीब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 12:24 am

Web Title: shah rukh khan to make his comeback with rajkumar hirani mppg 94
Next Stories
1 शक्ती मिल बलात्कार प्रकरणावर आधारीत आहे मर्दानी-2 ?
2 ‘तान्हाजी’च्या ट्रेलरमधील ‘त्या’ दृष्यावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप
3 आता हे काय नवं नाटक; प्रशांत दामलेंना प्रसाद ओकने नाकारली भूमिका
Just Now!
X