बॉलिवूडमधील प्रत्येक सुपरस्टारचा जीवनप्रवास हा वेगळा आहे. काहींनी पहिल्याच चित्रपटातून चाहत्यांची मने जिंकली तर काहींचे पहिले चित्रपट फ्लॉप ठरले. अभिनेता शाहरुख खानचाही जीवनप्रवास असाच काहीसा आहे. शाहरुखने ‘दीवाना’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि त्याच्या हिट चित्रपटांच्या यादीमध्ये पहिले स्थानही पटकावले. मात्र या चित्रपटानंतरचा त्याचा चित्रपट फ्लॉप ठरला. अशा प्रकारे शाहरुखच्या सुरुवतीच्या करिअरमध्ये काही चित्रपट हिट ठरले तर काही फ्लॉप.

‘दीवाना’नंतर शाहरुखचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. त्यामध्ये ‘माया मेमसाहाब’ या चित्रपटाचादेखील समावेश आहे. मात्र शाहरुखच्या या चित्रपटाची विशेष चर्चा झाली होती. या चित्रपटामध्ये शाहरुखने पहिला बोल्ड सीन दिला होता. शाहरुखसोबत या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपा साही मुख्य भूमिकेत होती. शाहरुख आणि दीपाच्या चित्रपटातील बोल्ड सीनमुळे त्यावेळी खळबळ उडाली होती. ‘माया मेमसाहाब’ चित्रपटाचे दिग्दर्शन केतन मेहताने केले होते.

केतन मेहता यांचा ‘माया मेमसाहाब’ चित्रपट ९०च्या दशकातील बोल्ड चित्रपटांच्या यादीमधील एक आहे. या चित्रपटाची कथा माया या विवाहित महिलेभोवती फिरताना दिसते. ही विवाहित महिला तिच्या संसारला कंटाळून अनेक पूरुषांसोबत अफेअर करते. काही दिवसांमध्ये या महिलेचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू होतो. चित्रपटात दीपा साहीने मायाची भूमिका साकारली होती. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही.

आणखी वाचा : तापसी पडली प्रेमात, प्रथमच बॉयफ्रेंडबद्दल केला खुलासा

शाहरुखच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातीला हा फ्लॉप चित्रपट आहे. शाहरुखने या चित्रपटात पहिला बोल्ड सीन दिला होता. परंतु शाहरुखची भूमिका आणि चित्रपट चाहत्यांच्या पसंतीला फारसा उतरला नाही. या चित्रपटानंतर तो चित्रपटसृष्टीमध्ये फार काळ टिकू शकणार नाही असे अनेक निष्कर्ष त्यावेळी लावण्यात आले होते. त्यानंतर शाहरुखने ‘डर’, ‘बाजीगर’ या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केली. शाहरुखने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यातील ‘माया मेमसाहाब’ हा एक चित्रपट