News Flash

शाहरुख-अनुष्काच्या ‘त्या’ नजरेने चाहत्यांना दिला धोका!

‘द रिंग’ची पहिली झलक पहाण्यासाठी चाहत्यामध्ये उत्सुकता आहे.

शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा ‘द रिंग’ चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा इम्तियाज अली दिग्दर्शित ‘द रिंग’ चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण संपल्यानंतर ‘रब ने बना दी जोडी’  चित्रपटात एकत्र थिरकलेल्या जोडीची नव्या चित्रपटातील पहिली झलक पहाण्यासाठी चाहत्यामध्ये उत्सुकता आहे. चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी शाहरुखने मंगळवारी आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला. हा फोटो ‘द रिंग’ चित्रपटाचा फर्स्ट लूक असल्याचे शाहरुखने म्हटले होते. या फोटोमध्ये शाहरुख आणि अनुष्का स्कार्फ, टोपी आणि जॅकेट परिधान करुन आपल्या डोळ्यांचे दर्शन देताना दिसतात. फोटोकडे पाहिल्यानंतर या चित्रपटाचे कथानक घाबरुन सोडणारे आहे का? अशी शंका देखील निर्माण होते. हा फोटो शेअर केल्यानंतर काहीवेळाने शाहरुखने पुन्हा एक ट्विट केले. यामध्ये त्याने डोळ्यांचे दर्शन देणारा फोटो हा ‘फस्ट लूक’ नसल्याचे सांगत असा चित्रपट करणे बादशहाची खासियत नसल्याचे सांगितले.  ‘द रिंग’चित्रपटाचे फर्स्ट लूकचा तो फोटो मजाक म्हणून शेअर केल्याचे त्याने म्हटले. शेअर केलल्या फोटोची सतत्या सांगताना आपला आगामी चित्रपट हा प्रेमपट किंवा भयपट नसून यामध्ये प्रेक्षकांना ‘निंजा एपिक’ची अनुभूती देणारा असल्याचे शाहरुखने स्पष्ट केले. शाहरुख आणि इम्तियाज अली पहिल्यांदा या चित्रपटात एकत्र काम करत आहेत.
बॉलिवूड बादशहाचा ‘रईस’ हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच, गौरी शिंदेच्या आगामी ‘डियर जिंदगी’ या चित्रपटात देखील शाहरुख खान आणि आलिया भट हे कलाकार झळकणार आहेत. त्यामुळे किंग खानच्या सिनेमांची ही रांग पाहता येणाऱ्या काळात बॉलिवूड शाहरुखमय होणार असेच दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 3:33 pm

Web Title: shahrukh khan tweeted the first look of imtiaz alis the ring
Next Stories
1 शाम बेनेगल पाकिस्तानी कलाकारासोबत चित्रपट करण्याच्या तयारीत, फवादला पसंती
2 ‘मोटू पतलू’चा मराठमोळा अंदाज
3 बाबा सेहगलची ऐकायलाच हवी अशी मजेशीर ‘टर-टर-टर’
Just Now!
X