News Flash

बोल्ड फोटो पोस्ट करत रसिकाने नेटकऱ्यांना दिली सक्त ताकिद

सोशल मीडियामुळे अनेकदा मनस्तापसुद्धा सहन करावा लागतो.

रसिका सुनील

सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी व चाहते यांच्यातील अंतर कमी झालं. या माध्यमामुळे सेलिब्रिटी सहजरित्या चाहत्यांपर्यंत पोहोचू लागले आणि चाहतेसुद्धा सेलिब्रिटींच्या सहज संपर्कात येऊ लागले. मात्र सोशल मीडियामुळे अनेकदा मनस्तापसुद्धा सहन करावा लागतो. ट्रोलिंग, मीम्स, टीकाटीप्पणी हे सर्व सुरूच असतं. काही कलाकार या सर्व गोष्टींना सडेतोड उत्तर देतात तर काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील हिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोसोबत तिने नेटकऱ्यांना सक्त ताकिदसुद्धा दिली.

रसिकाने बिकीनीमध्ये फोटोशूट केला. या फोटोशूटचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र त्यावर अयोग्य कमेंट्स येऊ नये यासाठी तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘मला हे लिहावं लागतंय हेसुद्धा फार त्रासदायक आहे. अयोग्य कमेंट्स डिलिट केले जातील आणि अकाऊंट्सची तक्रार दिली जाईल.’

रसिकाच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून भरभरून लाइक्स तर येतच आहेत, मात्र आता कमेंट करताना सावधगिरी बाळगली जात आहे. रसिका सध्या लॉकडाउनमुळे घरीच असून तिचे वेगवेगळे छंद जोपासत आहे. काही दिवसांपूर्वी ती ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात झळकली होती. यामध्ये तिने अमेय वाघ व सई ताम्हणकर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 10:00 am

Web Title: shanaya aka rasika sunil shared bold pic and condemned inappropriate comments ssv 92
Next Stories
1 माधुरीच्या बहिणीला कधी पाहिलं आहे का? मग ‘हा फोटो नक्कीच पाहा
2 …म्हणून साई पल्लवीने धुडकावलं तब्बल २ कोटी रुपयांचं मानधन
3 Video : विजय देवरकोंडाचं बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींवर आहे क्रश
Just Now!
X