News Flash

जब तक है जान : शाहरुखला पहिल्यांदा भेटल्यानंतर मी बेशुद्ध झालो होतो- शरीब हाश्मी

शरीबने हाश्मी त्याचा पहिला चित्रपट आणि शाहरुख सोबत पहिल्या सीनचा अनुभव सांगितला आहे.

शरीबने 'जब तक है जान' या चित्रपटात शाहरुखच्या जवळच्या मित्राची भूमिका साकारली होती. (Photo Credit : Indian Express)

अभिनेता शरीब हाश्मी ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधून जेकची भूमिका साकारत घराघरात पोहोचला. इथं पर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास हा खूप कसा होता हे शरीबने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे.

सुरुवातीला एम.टीव्ही वरील काही मालिकांसाठी शरीब लेखकाचं काम करायचा. सुरुवातीच्या काळात चांगली कामे करूण सुद्धा शरीबला चांगल्या भूमिका मिळण्यासाठी तब्बल ५ वर्ष लागली जेव्हा राज आणि डीकेने त्याला ‘फॅमिली मॅन’साठी तळपदे म्हणून घेतलं. त्यानंतर ‘असुर’, ‘स्कॅम १९९२’ आणि ‘दरबान’ सारख्या अनेक शोमध्ये काम केलं. एवढंच नाही तर ‘राम सिंग चार्ली’चा तो सह लेखक देखील होता. त्याचा प्रवास पाहता शरीब म्हणाला, “आज माझ्यावर यशाचा परिणाम होत नाही. मी चांगले आणि वाईट असे दोन्ही टप्पे पाहिले आहेत. वेळ बदलतो, आपण बदलायला नको.”

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

आपल्या पहिल्या चित्रपटाची आठवण करत शरीब म्हणाला, “मी एम. टीव्ही, युटीव्ही आणि चॅनल व्ही साठी वेगवेगळी काम करत असताना, मी ‘स्लमडॉग मिल्यिनीयर’मध्ये एक छोटासा रोल केला. त्यावेळी मी अभिनेता होईल असा विचार केला नव्हता. मग मी अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. सगळ्यात आधी मी ‘जब तक है जान’ हा चित्रपट केला. २०१० मध्ये मी ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली मात्र, काही मिळतं नव्हतं.”

आणखी वाचा : नाइलाज म्हणून शर्टाला बांधली गाठ, चाहत्यांनी फॅशन समजून केली कॉपी

पुढे तो म्हणाला, “त्याच्या तीन- चार महिन्यांनंतर मला यश राज मधून कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माचा फोन आला. तिने ‘मेहरू’नी पाहिल्यामुळे कॉल केला आणि मला ‘जब तक है जान’च्या ऑडिशनसाठी बोलावले. सगळ्यात आधी त्यांच्या जुहूमधील कास्टिंग ऑफिसमध्ये, नंतर यशराजच्या स्टुडिओमध्ये ऑडिशनच्या अनेक फेऱ्या झाल्या. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये मी विनय पाठक यांचे ‘रब ने बना दी जोडी’चे सीन केले. चौथ्या फेरीला मला ‘जब तक है जान’चे सीन मिळाले. मग एक दिवस शानूने मला रात्री उशिरा फोन केला आणि म्हणाली की माझी निवड झाली नाही, त्याऐवजी ती भूमिका दुसर्‍या अभिनेत्याला मिळाली आहे. मला वाईट वाटले होते पण माझ्याकडे ऑफिसची नोकरी होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharib Hashmi (@mrfilmistaani)

पुढे तो म्हणाला, “काही दिवसांनी त्यांचा पुन्हा कॉल आला. यावेळी यश चोप्रा यांच्या असिस्टंटने मला फोन केला होता. त्याने मला पुन्हा एकदा ऑडिशनसाठी बोलावले. मी अगोदरच ५ वेळा ऑडिशन दिलं होतं, सहाव्या वेळी काय बदलणार आहे. तरी, मी गेलो. ऑडिशन देऊन मी पुन्हा ऑफिसला गेलो. अर्ध्या तासात मला फोन आला आणि सांगण्यात आले की मला ती भूमिका मिळाली आहे आणि दोन दिवसात चित्रीकरण सुरु करणार आहे. माझा आनंद हा शिगेला पोहोचलो.”

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील नवीन सोनू कोणाला आवडत नव्हती, गोलीने केला खुलासा

पुढे शरीब म्हणाला, “माझा चित्रीकरणाचा पहिल्या दिवस आणि पहिला सीन हा समर म्हणजेच शाहरुख झैनच्या चेहऱ्यावरून बेडशीट काढतो. मी सहाय्यत दिग्दर्शकासोबत त्या सीनची तयारी करत होतो. पण एकदा जेव्हा बेडशीट काढली तेव्हा मी तिथे शाहरुखला पाहिलं. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला हॅलो, मी शाहरुख. हे पाहूण मी आश्चर्यात पडलो. त्या दिवशी चित्रीकरण संपल्यानंतर शाहरुख सर मला म्हणाले, तुझ्या सोबत काम करायला मज्जा आली आणि तू एक चांगला अभिनेता आहेस. मी दोन दिवस यश राज स्टुडिओमध्ये चित्रीकरण केले आणि नंतर आम्ही लंडनला गेलो. यश चोप्रा सरांनीही माझे कौतुक केले. ते म्हणाले, “तू पंजाब से है क्या?” मी त्याला सांगितले की मी मुंबईत लहानाचा मोठा झालो आणि मी पंजाबी नाही. ते म्हणाले मी खूप चांगला अभिनय करत आहे. म्हणून माझा पहिला दिवस नेहमीच खास आणि संस्मरणीय राहील.”

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 6:03 pm

Web Title: sharib hashmi jab tak hai jaan first film acting debut first of many dcp 98
Next Stories
1 रेनबो ड्रेस परिधान करत ‘चुलबुल अवतार’ मध्ये दिसली शमा सिकंदर
2 ‘श्रीमंताघरची सून’ मालिकेत साजरी होणार वटपौर्णिमा
3 खाकी वर्दीत संजूची वटपौर्णिमा; रणजीतची मिळाली साथ
Just Now!
X