News Flash

कुटुंबाचा विरोध पत्करुन शर्मननं केला ‘हेट स्टोरी’; अन् त्यानंतर घडलं असं काही…

विरोध पत्करुन शर्मननं केला 'हेट स्टोरी'; बोल्ड सीन पाहून कुटुंबीय म्हणाले...

हेट स्टोरी ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध एरॉटिक फिल्म फ्रेंचाईजी आहे. या मालिकेतील हेट स्टोरी ३ या चित्रपटाला आज पाच वर्ष पुर्ण झाली आहेत. या चित्रपटात अभिनेता शर्मन जोशी याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र या चित्रपटामुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली. कुटुंबीयांनी देखील त्याला अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरी देखील सर्वांच्या विरोधात जाऊन त्याने या चित्रपटात काम केलं, कारण…

अवश्य पाहा – ‘तुझ्यासारखी चमचेगीरी करत नाही’; शेतकरी आंदोलनावरुन कंगना-दिलजितमध्ये जुंपली

अलिकडेच इ टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शर्मननं हेट स्टोरी ३ या चित्रपटावर भाष्य केलं. तो म्हणाला, “माझे मित्रमंडळी, कुटुंबीय आणि चाहत्यांनी देखील या चित्रपटात काम न करण्याचा सल्ला मला दिला होता. परंतु या चित्रपटाची पटकथा मला आवडली होती. शिवाय आजवर मी अशा प्रकारच्या जॉनरमध्ये कधीही काम केलेलं नव्हतं त्यामुळे मी होकार दिला. मी एरॉटिक जॉनरमध्ये देखील यशस्वी होऊ शकतो का? हे मला पडताळून पाहायचं होतं. अर्थात या चित्रपटात खूप जास्त बोल्ड सीन होते. पण या चित्रपटानं मला एक वेगळा अनुभव दिला. कदाचित पुन्हा मी अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करणार नाही”

अवश्य पाहा – अक्षय-सलमानलाही सोडलं मागे; हे ठरले २०२० मधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार

शर्मन जोशी हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘थ्री इडियस्ट’, ‘गोलमाल’, ‘रंग दे बसंती’, ‘मिशन मंगल’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे. या पार्श्वभूमीवर त्याने एखाद्या एरॉटिक चित्रपटात काम करु नये अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली होती. तरी देखील त्याने हेट स्टोरीमध्ये काम केलं. या चित्रपटात त्याने काही बोल्ड सीन देखील दिले आहेत. मात्र ही दृश्य त्याच्या चाहत्यांना आवडली नाही. परिणामी त्याच्यावर टीका करण्यात आली. त्या टीकाकारांना शर्मननं या मुलाखतीद्वारे प्रत्युत्तर दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 2:56 pm

Web Title: sharman joshi hate story 3 mppg 94 2
Next Stories
1 नीतू कपूर, वरुण धवन करोना पॉझिटिव्ह? ‘जुग जुग जियो’चं चित्रीकरण अर्ध्यावर
2 “याला म्हणतात आत्मसन्मान”; ते दृश्य पाहून प्रकाश राज यांनी केलं शेतकऱ्यांचं कौतुक
3 ‘लिज्जत पापड’ची यशोगाथा रुपेरी पडद्यावर; आशुतोष गोवारीकरांच्या चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची वर्णी
Just Now!
X