06 March 2021

News Flash

‘म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले’, शिल्पा शेट्टीने शेअर केला व्हिडीओ

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच शिल्पाने राज कुंद्राचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ शेअर करत तिने म्हणूनच मी राज कुंद्राशी लग्न केले असे म्हटले आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा पती राज कुंद्रा बोलताना दिसत आहे की आपल्या मुलांना शिकवायला हवे की डोक्यावर छप्पर असणे, ताटात जेवण मिळणे आणि झोपण्यासाठी चांगली जागा मिळणे सोपी गोष्ट नसते. व्हिडीओमध्ये राज आणि मुलगा विआन थंडीमध्ये फुटपाथवर झोपणाऱ्या गरीब व्यक्तींना ब्लँकेट देताना दिसत आहे.

राजने हा व्हिडीओ सकाळी सहा वाजता शूट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिल्पाने, ‘एखाद्या व्यक्तीचे मन चांगले असले की ती व्यक्ती एक चांगला माणून म्हणून ओळखली जाते. तू एक चांगला मुलगाच नाहीस तर भाऊ आणि पती देखील आहेस. तू एक उत्तम वडिल देखील आहेस. म्हणूनच मी राज कुंद्रा तुझ्याशी लग्न केले’ या आशायचे कॅप्शन शिल्पाने व्हिडीओ शेअर करत दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2021 4:43 pm

Web Title: shilpa shetty husband raj kundra distribute blankets to poor with his son viaan avb 95
Next Stories
1 मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतली नवी कार
2 मराठमोळ्या दिग्दर्शकाचा बहुचर्चित चित्रपट ‘द डिसायपल’ होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित
3 ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं होणार प्रेमात रुपांतर?
Just Now!
X