हिंदी सिनेसृष्टीतील माइलस्टोन असे ज्या सिनेमाचे वर्णन केले जाते तो सिनेमा म्हणजे शोले. या सिनेमातील प्रत्येक पात्र लोकांच्या आजही लोकांच्या लक्षात आहे. याच सिनेमात कैद्याची भूमिका साकारून घराघरात पोहचलेले अभिनेते राज किशोर यांचे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील गोरेगाव भागात त्यांचे घर होते. शोले सिनेमात असरानी यांचा जो जेलरचा प्रसंग आहेत त्या सिनेमात एका कैद्याशी असरानी डोळ्याला डोळे भिडवून बोलत असतात. त्या कैद्याची भूमिका राज किशोर यांनीच साकारली आहे.
शोले शिवाय राज किशोर यांनी दिवार, हरे रामा हरे कृष्णा, राम और श्याम, पतंगा, कुदरत, बॉम्बे टू गोवा, करण अर्जुन, पडोसन या सिनेमांमध्येही काम केले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगा असे कुटुंब आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी ट्विटर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे.