02 March 2021

News Flash

“आता खरी माहिती बाहेर पडेल”; सुशांत प्रकरणावर वकिल विकास सिंह यांची प्रतिक्रिया

"मुंबई पोलीस मोठं काहीतरी लपवत होते"; शोविक चक्रवर्तीला अटक होताच सुशांत कुटुंबीयांच्या वकिलांनी दिली प्रतिक्रिया

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) शुक्रवारी रात्री अटक केली. चक्रवर्ती कुटुंबातील ही पहिलीच अटक आहे. दरम्यान NCBने केलेल्या या कारवाईवर सुशांतच्या कुटुंबीयांचे वकिल विकास सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठलाच डॉक्टर आपल्या रुग्णाच्या मानसिक स्थितीबाबत टीव्हीवर येऊन चर्चा करत नाही. असं म्हणत त्यांनी सुशांतची ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अवश्य पाहा – ड्रग्स प्रकरणात दाक्षिणात्य अभिनेत्रीला अटक; समोर आली आणखी १५ नावं

एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत विकास सिंह यांनी NCBने केलेल्या कारवाईवर भाष्य केलं. ते म्हणाले, “रियाच्या भावाला अटक झाल्यामुळे या प्रकरणात ज्या गोष्टी आधी लपवल्या जात होत्या आता हळूहळू बाहेर पडतील. डॉक्टरांनी सुशांतला कशाच्या आधारावर मानसिक रुग्ण म्हणून घोषित केलं हे अद्याप कळलेलं नाही. ट्रीटमेंट करण्याआधी त्यांनी सुशांतच्या कुटुंबीयांशी संपर्क का साधला नाही? आता ते टीव्हीवर येऊन त्याच्या मानसिक स्थितीबाबत बोलत आहेत. कुठलाच डॉक्टर रुग्णाच्या मानसिक स्थितीबाबत टीव्हीवर येऊन चर्चा करत नाही.” असं म्हणत त्यांनी सुशांतची ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अवश्य पाहा – “किसिंग करण्यास नकार दिल्यामुळे चित्रपटातून काढलं”; अभिनेत्रीने सांगितला चकित करणारा अनुभव

शोविक चक्रवर्तीसह दोघांना अटक

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) शुक्रवारी रात्री अटक केली. चक्रवर्ती कुटुंबातील ही पहिलीच अटक आहे. या घडामोडीमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अंमलीपदार्थाबाबतचे तपशील का मिळू शकले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शोविकनंतर एनसीबी रियाकडे चौकशी करण्याची शक्यता आहे.
शोविक, मिरांडा यांनी सुशांतला अंमलीपदार्थाच्या नशेची सवय लावून अंमलीपदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. दोघांच्या अटकेला एनसीबीचे उपसंचालक के पीएस मल्होत्रा यांनी दुजोरा दिला. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रियासह शोविक आणि मिरांडा संशयित आरोपी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2020 1:55 pm

Web Title: shovik chakraborty arrested in sushant singh rajput death case mppg 94
Next Stories
1 “मी मराठी नाही पण…”; बाळासाहेबांसोबतचा फोटो पोस्ट करत सुमीतचा राऊतांना सवाल
2 “तो माझा ना मित्र होता, ना भाऊ; पण…”: सुशांत प्रकरणामुळे अभिनेता अस्वस्थ
3 रियाच्या घरी छापा टाकणारा NCBचा अधिकारी आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा पती
Just Now!
X