News Flash

नव्या मालिकेसाठी सज्ज झालाय सिद्धार्थ चांदेकर

‘सांग तू आहेस का’ असं त्याच्या नव्या मालिकेचं नाव आहे.

‘अग्निहोत्र’, ‘कशाला उद्याची बात’, ‘जिवलगा’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांनंतर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा एका नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सांग तू आहेस का’ असं त्याच्या नव्या मालिकेचं नाव असून ७ डिसेंबरपासून स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु होत आहे. यावर्षातला हा नवा प्रोजेक्ट असल्यामुळे सिद्धार्थ फारच उत्सुक आहे.

या नव्या मालिकेविषयी सांगताना सिद्धार्थ म्हणाला, “स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझं जिव्हाळ्याचं नातं आहे. कारण अग्निहोत्र ही माझी पहिली मालिका मी स्टार प्रवाहसोबत केली. चांगली वाहिनी, चांगली कथा, चांगली निर्मिती संस्था आणि चांगला दिग्दर्शक हा मेळ जुळून आल्यामुळेच ही मालिका मी स्वीकारली. लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मालिकेचा हा बाज माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे. मी याआधी हॉरर जॉनरमध्ये काम केलेलं नाही. मालिकेचा सेटअप ज्यापद्धतीने तयार केला आहे तो प्रेक्षकांसाठी नक्कीच नवा अनुभव असेल. विशेष म्हणजे मालिकेत नवनवी सरप्राईजेस आहेत जी प्रत्येक भागात उलगडत जातील. या मालिकेची गोष्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवेल याची मला खात्री आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 5:47 pm

Web Title: siddharth chandekar expressed happiness about his new marathi serial ssv 92
Next Stories
1 बिग बॉसच्या घरात राहुलने केलं प्रेयसीला प्रपोज, दिशा परमार म्हणाली…
2 उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर शेअर केला मोबाईल नंबर, पण…
3 ‘यंदा किल्ल्यांपेक्षा हॅलोविनचेच फोटो जास्त’; देवदत्त नागेने व्यक्त केली खंत
Just Now!
X