बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुल्का विविध कारणांमुळे कायम चर्चेत असतोय नुकताच सिद्धार्थच्या ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला असून चाहत्यांकडून या ट्रेलरला मोठी पसंती मिळतेय. यातच आता सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिद्धार्थ शुक्ला लवकरच प्रभासच्या ‘आदीपुरष’ या बिग बजेट सिनेमात एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

‘आदिपुरूष’ हा रामायणावर आधारित एक पीरियड ड्रामा सिनेमा आहे. सिद्धार्थ या सिनेमात रावण आणि मंदोदरीच्या मुलाची म्हणजेच मेघनादची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. ‘आदिपुरूष’ च्या टीमने सिद्धार्थची फोनवर संपर्क साधून स्क्रीप्टबद्दल बोलणं झालंय. सिद्धार्थला ही भूमिका पसंतीस पडल्याचं म्हंटलं जातंय. मात्र अद्याप या गोष्टीची अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

या कलाकांची मुख्य भूमिका

‘आदिपुरुष’ बिग बजेट सिनेमा असून या सिनेमात प्रभाससोबत अभिनेत्री कृति सेनन झळकरणार आहे. या सिनेमात प्रभास रामाची भूमिका साकारणार आहे.तर कृति सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. रावणाची भूमिका अभिनेता सैफ अली खान साकारणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राउत करत आहेत.

सिनेमासाठी 350 कोटी खर्च

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आदिपुरुष’ सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यात आलं होतं. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे शूटिंग पुन्हा ठप्प पडलं. मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमासाठी जवळपास ३५० ते ४०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत. हा सिनेमा हिंदी, तमिळ,तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.