News Flash

झाली रे झाली नऊ वर्षे झाली! जयकांत शिक्रे ‘सिंघम’च्या आठवणी जागवत म्हणाला…

'सिंघम स्टाईल'मध्ये मानले प्रेक्षकांचे आभार

‘सिंघम’ हा अभिनेता अजय देवगणच्या करिअरमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे डायलॉग्स आजही तितकेच लोकप्रिय आहेत. या सुपरहिट चित्रपटाला आज नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अभिनेते प्रकाश राज यांनी ‘सिंघम’च्या संपूर्ण टीमचं कौतुक करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

अवश्य पाहा – विद्युत जामवालने वाढवला देशाचा मान; व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत ‘या’ यादीत मिळवलं स्थान

प्रकाश राज यांनी आपल्या मुलासोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये ते आपल्या मुलासोबत सिंघमची पोज देताना दिसत आहेत. “सिंघमला ९ वर्ष पूर्ण झाली. आता माझी सटकली. जयकांत शिक्रेला इतकं प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार. रोहित शेट्टी, अजय देवगन, काजल अग्रवाल, फरहाद सामजी, अजय अतुल, रिलायंस एन्टरटेंन्मेंट आणि सिंघमच्या संपूर्ण टीमला धन्यवाद.” असं ट्विट करुन त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अवश्य पाहा – ‘जय महाराष्ट्र’ म्हणत अमेरिकेतील डॉक्टर करतोय रुग्णांची सेवा; अवधूत गुप्तेने केलं कौतुक

‘सिंघम’च्या यशामागे प्रकाश राज यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी या चित्रपटात जयकांत शिखरे ही खलनायक व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात त्यांनी केलेला अभिनय वाखाणण्याजोगा होता. ‘सिंघम’मध्ये त्यांनी आपल्या अनोख्या शैलीत उच्चारलेले डायलॉग्स आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतात. हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘सिंघम’चं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 3:58 pm

Web Title: singham complete 9 years prakash raj thanks to audience mppg 94
Next Stories
1 छोट्या पडद्यावरील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला ओळखलं का?
2 ‘टायगर सीरिज’च्या तिसऱ्या चित्रपटासाठी सलमान-कबीर खान करणार एकत्र काम?
3 ‘बॉलिवूडवर चर्चा करुन आपली दिशाभूल केली जातेय’; संगीतकाराने साधला सरकारवर निशाणा
Just Now!
X