अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने आगामी ‘नूर’ या चित्रपटात अन्यायाविरूद्ध लढणाऱ्या एका धडाडीच्या पत्रकाराची भूमिका केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पिंपरीत आल्यानंतर, पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याविषयी तिला विचारण्यात आले असता, तिने याविषयी आपल्याला काहीही माहिती नाही, असे प्रांजळपणे कबूल केले. पत्रकारांवर हल्ले होतात का, असा प्रश्न तिने पत्रकारांनाच विचारला.
पीव्हीआर कंपनीने पिंपरीतील ‘सिटी वन’ मॉलमध्ये चौथे मल्टिप्लेक्स सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन सोनाक्षी तसेच अभिनेता करण गिल यांच्या हस्ते झाले. सोनाक्षी आणि करण हे दोघेही आगामी ‘नूर’ चित्रपटात एकत्र आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते शहरात आले होते. मुंबईवर आधारित असलेल्या या चित्रपटात सोनाक्षीने मोठी स्वप्नं व आकांक्षा असलेल्या पत्रकाराची भूमिका साकारली आहे. दुपारी साडेबारा वाजता येणारी सोनाक्षी दीडच्या सुमारास दाखल झाली. तिला पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. तिच्या हस्ते पीव्हीआर मल्टिप्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर, तिने पत्रकारांशी संवाद साधला. ‘नूर’ चित्रपटाविषयी बोलताना सोनाक्षी खूपच उत्साही होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2017 2:07 am