News Flash

“उद्या तुमच्या मुलांना इंडस्ट्रीत येऊ देणार नाही का?”; घराणेशाहीवर टीका करणाऱ्यांना सोनी राजदान यांचा सवाल

सोशल मीडियावर घराणेशाही या मुद्द्याने चांगलाच जोर धरला आहे

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर घराणेशाही या मुद्द्याने चांगलाच जोर धरला आहे. आतापर्यंत या प्रकरणी अनेक कलाकारांनी त्यांची मत मांडली होती. त्यातच आता सोनी राजदान यांनीही त्यांचं मत मांडलं आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या ट्विटला उत्तर देत त्यांनी घराणेशाहीवर टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

काही दिवसापूर्वी दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी एक ट्विट केलं होतं. यात त्यांनी कलाविश्वात घराणेशाही आहे असं म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटला सोनी राजदान यांनी उत्तर दिलं आहे.

“तुम्ही कोणाची मुलगी किंवा मुलगा आहात हे समजल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षा वाढतात. तसंच सध्या जे लोक घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन चर्चा करत आहेत. टीका करत आहेत. तेच लोक त्यांच्या मुलांना कलाविश्वात येण्यासाठी पाठिंबा देतील. जर त्यांच्या मुलांची कलाविश्वात येण्याची इच्छा असेल तर ते नक्कीच आपल्या मुलांना पाठिंबा देतील. आणि जर त्यांच्या मुलांची खरंच कलाविश्वात येण्याची इच्छा असेल तर काय? ते आपल्या मुलांना विरोध करु शकतात?”, असं प्रत्युत्तर सोनी राजदानने हंसल मेहता यांना दिलं आहे.

सध्या सोनी राजदान यांचं हे ट्विट चांगलंच चर्चिलं जात आहे. काही दिवसापूर्वी हंसल मेहता यांनी घराणेशाहीवर एक वक्तव्य केलं होतं. घराणेशाहीवरुन सुरु असलेला वाद अजून व्यापक व्हा. कलाविश्वात कायम मेरीट पाहिलं जातं. मी या क्षेत्रात होतो, म्हणून माझ्या मुलाला येथे संधी देण्यात आली आणि तो आता त्याच्या कर्तृत्वार येथे स्थान भक्कम करुन आहे,अशा स्वरुपाचं ट्विट त्यांनी केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 2:14 pm

Web Title: soni razdan furious reply on nepotism tweet went viral ssj 93
Next Stories
1 सुशांतचा फजसोबत गोविंदाच्या गाण्यावर डान्स; व्हायरल होतोय व्हिडीओ
2 ‘सुशांतचा आधार न घेता घराणेशाहीला विरोध करा’; इरफान खानच्या मुलाने केलं आवाहन
3 “सर्वाधिक घराणेशाही बॉलिवूडमध्येच”; कुमार सानू यांनी व्यक्त केला संताप
Just Now!
X