News Flash

मुलासाठी ३ कोटीच्या कारच्या गिफ्टवर सोनू सूदनं दिलं हे स्पष्टीकरण

सोनू सूदने स्वतः पुढे येत मुलासाठी ३ कोटीची महागडी कार घेतल्याच्या अफवांचं खंडन केलंय.

करोना काळात लोकांना मदत करून बॉलिवूडमधील अभिनेता सोनू सूद गरिबांचा ‘देवदूत’ बनला आहे. आतापर्यंत करोना काळात तो करत असलेल्या त्याच्या कामांवर चर्चा सुरू होत्या. पण गेल्या एक दिवसापासून तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला. सोनू सूदचा मुलगा ईशान नुकताच १८ वर्षांचा झालाय. फादर्स डे च्या एक दिवस आधी अभिनेता सोनू सूदने आपल्या मुलाला तब्बल ३ कोटी रूपयाची महागडी आणि लक्झरी कार कार गिफ्ट केली. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यावर आता सोनू सूदने मौन सोडलंय. त्याने मुलासाठी कोणतीच कार घेतली नसल्याचं त्याने सांगितलंय.

सोनू सूदने स्वतः पुढे येत मुलासाठी ३ कोटीची महागडी कार घेतल्याच्या अफवांचं खंडन केलंय. यावेळी त्याने सांगितलं की, “यात कोणतही सत्य नाही. मी माझ्या मुलासाठी कोणतीच कार घेतलेली नाही. व्हिडीओमध्ये दिसत असलेली कार आमच्या घरी ट्रायलसाठी आली होती. आम्ही टेस्ट ड्राईव्ह साठी गेलो होतो. पण आम्ही कोणतीच कार खरेदी केली नाही.” यापुढे बोलताना सोनू सूद म्हणाला, “यात फादर्स डे चा अ‍ॅंगल कुठून आला ते माहित नाही मला. फादर्स डे च्या दिवशी मी माझ्या मुलाला गिफ्ट का देणार ? याउलट त्यांनी मला काही तरी गिफ्ट केलं पाहिजे. शेवटी आज माझा दिवस आहे.”

फादर्स डे च्या दिवशी हवंय हे गिफ्ट

यावेळी सोनू सूद म्हणाला, “माझी दोन्ही मुलं माझ्यासोबत संपूर्ण दिवस घालवतील तोच माझ्यासाठी फादर्स डे चं गिफ्ट होईल. कारण माझ्याकडे त्या दोघांसाठी खूप कमी वेळ असतो. आता ते दोघेही मोठे होत आहेत. त्यांचंही आता वेगळं जीवन सुरू होईल. त्यामुळे सोबत एकत्र दिवस घालवला तरी ते काही लक्झरीपेक्षा काही कमी ठरणार नाही. जे मला हवंय ते मी कमवलंय.”

फॅन्सचे मानले आभार

सोनूने महागडी कार मुलाला गिफ्ट केल्याच्या वृत्तावर फॅन्स ज्या प्रकारे व्यक्त झाले, त्याबद्दल त्याने फॅन्सचे आभार मानले आहेत. यावेळी तो म्हणाला, “या वृत्तावर ९० पेक्षा लोकांचे कमेंट्स हे माझ्या बाजूने होते. गेल्या एक महिन्यापासून जी मला सकारात्मकता आणि प्रेम मिळतंय, त्यासाठी सर्वांचा मी आभारी आहे. हेच जीवनातलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. मग किती तरी जणांनी माझ्या कामाप्रती लोकांच्या मनातील विचारांना बदलण्याचा प्रयत्न केला तरी माझे शुभचिंतक कधीच माझ्यावर शंका घेणार नाहीत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 9:57 am

Web Title: sonu sood refutes rumours of buying rs 3 cr luxury car says the car was brought to our home for a trial prp 93
Next Stories
1 सकारात्मक ऊर्जेसाठी योग उत्तम – अमृता खानविलकर
2 आशुतोषसोबतच्या नात्यावरुन सुरु असलेल्या चर्चेवर तेजश्री प्रधानचा खुलासा
3 कलर्स मराठीवर आजपासून ‘जीव माझा गुंतला’ मालिका
Just Now!
X