करोनाची दुसरी लाट आल्याने देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांनाची संख्या वाढताना दिसते. याशिवाय अनेक रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने प्राण गमवावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात २५ रुग्णांचा आणि विरार शहरात १३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर अशा कठीण परिस्थितीत अभिनेता सोनू सूद सगळ्यांची मदत करण्यासाठी पुन्हा एकदा समोर आला आहे. एवढंच नाही तर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना प्रेरित करतोय.

सोनूने आता नुकतचं एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये सोनूने स्वत: ला देश भक्त म्हणणाऱ्या लोकांना संबोधीत केलं आहे. ‘१५ ऑगस्टला देशभक्ती दाखवणाऱ्यांसाठी संदेश…देशासाठी काही करण्याची आणि देशभक्ती दाखवण्याची याहून चांगली संधी कधी मिळणार नाही,’ असं ट्वीट सोनूने केलं आहे. फक्त एक दिवस देशभक्ती दाखवून काहीच होणार नाही. तर आता खरी देशभक्ती दाखवायची वेळ आली असल्याचं त्याने या ट्वीटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनू गेल्या वर्षी गरजूंच्या मदतीसाठी देवदुतासारखा धावून आला होता. आता तर सोनू रुग्णांना बेड्स, औषध तसेच ऑक्सिजन मिळून देण्याचा प्रयत्न करत आहे.