01 March 2021

News Flash

‘कमबॅक करायचा असेल तर करण जोहरच्या…’, सुचित्रा कृष्णमूर्तिचा खुलासा

तिने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी KWAN सध्या चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर समोर आलेल्या ड्रग्ज चॅटशी या कंपनीतील कर्मचाऱ्यांचा संबंध असल्याचे समोर आले. यामध्ये दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश ते रिया चक्रवर्तीची मॅनेजर जया साहा यांची नावे समोर आली. आता अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तिने या कंपनीशी संबंधीत खुलासा केला आहे. यामध्ये तिने या कंपनीमधील एका महिलेने तिला बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी करण जोहरच्या पार्ट्यांना उपस्थित राहण्याचा सल्ला दिला होता.

सुचित्राने नुकताच इंडिया टूडेला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ‘मी एका महिलेशी बोलत होते तेव्हा तिने मला पुन्हा अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यावर मी माझी मुलगी लहान असल्याचे तिला म्हटले. तिने त्यावर मॅडम हे फार कठिण नाही आणि तुम्हाला लाइमलाइटमध्ये पुन्हा येण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला करण जोहरच्या पार्टीमध्ये उपस्थित राहावे लागेल’ असे म्हटले.

त्यानंतर सुचित्राला बॉलिवूडमधील ड्रग्ज सेवन प्रकरणाविषयी विचारण्याच आले. ‘बॉलिवूड बऱ्याच वेळा शांत असते’ असे तिने त्यावर म्हटले आहे.

यापूर्वी बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घराणेशाही या वादावर सुचित्राने वक्तव्य केले होते. त्यावेळी तिने नेहा धूपिया ही करण जोहरची खास मैत्रीण आहे असे म्हणत तिच्यावर निशाणा साधला होता. तेव्हा त्या दोघींमध्ये ट्विटरवॉर सुरु होते. ‘मित्रांनो बॉलिवूडमध्ये घराणेशाहीपेक्षा चमचागिरी विरोधात आवज उठवण्याची गरज आहे. मला कळत नाही नेहा धूपियाला अचानक इतके टॉक शो कसे मिळाले. याचे कारण एकच आहे ती करण जोहरची नविन खास मैत्रीण आहे आणि फेमिना मिस इंडिया २००२ आहे. ती स्टार किडही नाही’ असे सुचित्राने ट्विटमध्ये होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 6:42 pm

Web Title: suchitra krishnamoorthi makes shocking claim avb 95
Next Stories
1 ‘माल है क्या?’ असे विचारलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची अ‍ॅडमिन होती दीपिका?
2 ‘दोन दिवसात घरी परत येईन’, बालसुब्रमण्यम यांचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल
3 CSKने वाहिली बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली
Just Now!
X