प्रेमाला शब्दाची नाही तर नजरेची भाषा कळते. म्हणूनच मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो असं म्हणतात. बऱ्याच जणांना मैत्रीत प्रेमं गवसतं, तर काहींना एका नजरेत, पण काहींच्या बाबतीत मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो. क्षणात नाती जोडली जातात, क्षणात आयुष्य बहरत, क्षणात जीव जडतो. हा क्षण माणसाच्या आयुष्यभर लक्षात रहातो. असचं काहीसं अनु आणि सिध्दार्थच्या बाबतीत देखील आहे. कोणता क्षण अनु आणि सिध्दार्थ एकत्र आणणार? तो क्षण कधी येणार? हे बघणं उत्सुकतेचे असणार आहे. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे यांच्या नात्याला एक नवी कलाटणी मिळणार आहे हे प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार आहे. प्रेमाची व्याख्या बदलणारी कथा सुखाच्या सरींनी… हे मन बावरे ही मालिका घेऊन येत आहे. येत्या ९ ऑक्टोबर पासून रात्री ८.०० वाजचा सोमवार ते शनिवार कलर्स मराठीवर हा मालिका प्रसारित होणार आहे.

या मालिकेत जुई म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मृणाल दुसानीस अनुची तर सिद्धार्थची भूमिका शशांक केतकर साकारणार आहे. या मालिकेमधून पहिल्यांदाच मृणाल आणि शशांकची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, नयना आपटे, शर्मिष्ठा राउत हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

वाचा : मुळशी पॅटर्न वाद : गाण्यात गुन्हेगारांच्या झळकण्याचं दिग्दर्शक प्रवीण तरडेंकडून खुलेआम समर्थन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मध्यमवर्ग कुटुंबामधली अनुश्री ही अत्यंत स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे, जिचं आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेमं आहे. अनुश्री सगळ्या घराचा भार स्वत:च्या खांद्यावर घेऊन कुटुंबाचा सांभाळ हसतमुखानं करते. ‘जेव्हा परिस्थिती बदलता येत नाही, तेव्हा मनस्थिती बदलावी’ असे अनुचे आयुष्याबद्दलचे मत आहे. तर दुसऱ्या बाजूला सिध्दार्थ तत्ववादी हा गर्भश्रीमंत आणि उच्चभ्रू घरामधला, कर्तृत्ववान आणि आईवर प्रचंड प्रेम करणारा मुलगा आहे. सिध्दार्थच्या घरामध्ये त्याच्या लग्नाची चर्चा सुरु आहे परंतु आजवर त्याला कोणतीच मुलगी आवडलेली नाही. अनु आणि सिध्दार्थचं भावविश्व खूप वेगळं आहे. लग्नाबद्दल या दोघांचंही मत वेगळं आहे. जेव्हा ही दोन वेगळी माणसं एकमेकांना भेटतील तेव्हा काय होईल, त्यांची मनं कशी जुळतील, हा प्रवास बघणं रंजक असणार आहे.