News Flash

सुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम

विशाल भारद्वाज यांच्या आगामी चित्रपटात कॉमेडियन सुनील ग्रोवर मुख्य भूमिका साकारणार असल्याचं वृत्त समोर येताच आता त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.

सुनील ग्रोवर

प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आगामी चित्रपटात कॉमेडियन सुनील ग्रोवर मुख्य भूमिका साकारणार असल्याचं वृत्त समोर येताच आता त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. सुनीलला जॅकपॉटच लागला असून तो बॉलिवूडच्या तीन खानपैकी एका खानसोबत भूमिका साकारणार आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुनील सलमान खानसोबत काम करणार असून त्याच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटात तो झळकणार आहे. सलमान आणि प्रियांका चोप्राची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात तो सलमानच्या मित्राची भूमिका साकारणार आहे. सलमानच्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित केलेल्या ‘सुपर नाइट विथ ट्युबलाइट’ या कार्यक्रमासाठी सुनीलची निवड करण्यात आली. त्यामुळे सलमान आणि सुनीलमध्ये चांगली मैत्री झाली असून ‘भारत’मधील भूमिका त्यामुळेच मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

वाचा : ‘केसरी’च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार

कॉमेडी शोसोबतच सुनीलने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘गजनी’, ‘हिरोपंती’, ‘गब्बर इज बॅक’ आणि ‘बागी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तो झळकला. विशाल भारद्वाजच्या आगामी ‘छुरियाँ’ या चित्रपटात तो दंगल गर्ल सान्या मल्होत्रा, टीव्ही स्टार राधिका मदत यांच्यासोबत भूमिका साकारणार आहे. आता अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ या चित्रपटातही झळकण्याची संधी मिळाल्याने येत्या काळात चित्रपटांमध्ये सुनीलच्या अभिनयाचे नवे पैलू त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार हे नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 12:52 pm

Web Title: sunil grover in salman khan and priyanka chopra starrer bharat
Next Stories
1 ‘केसरी’च्या शूटिंगदरम्यान अक्षयला दुखापत, उपचारासाठी मुंबईला परतण्यास दिला नकार
2 जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत दीपिका, विराट कोहली !
3 अभिनेता अली जफरवर पाकिस्तानी गायिकेकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप
Just Now!
X