26 January 2021

News Flash

‘स्पर्धा किती वाढली आहे’; लग्नसमारंभातील नियमावलीवर सुनील ग्रोवरचं मजेशीर ट्विट

५० जणांच्या उपस्थितीत करावं लागणार लग्न

लॉकडाउनमुळे रखडलेल्या लग्न समारंभाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयानंतर सर्व स्तरांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. यात विनोदवीर सुनील ग्रोवर एक मजेशीर ट्विट केलं आहे.

“स्पर्धा किती वाढली आहे. पहिले फक्त शिक्षण आणि नोकरीसाठीच स्पर्धा होती. पण आता लग्नातल्या पंगतीत बसण्यासाठीदेखील पहिल्या ५० मध्ये आपलं नाव येणं गरजेचं आहे”, असं ट्विट सुनीलने केलं आहे. सध्या सुनीलचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जातं आहे. विशेष म्हणजे समाजात घडणाऱ्या अनेक घटनांवर सुनील बेधडकपणे व्यक्त होत असतो. तर काही वेळा तो विनोदी अंगाने त्यावर भाष्य करतो.

वाचा : च्युइंगममुळे मिळाली ‘जंजीर’मधील भूमिका;बिग बींनी सांगितला भन्नाट किस्सा

लग्नांसाठी नियम

केवळ ५० जणांच्या उपस्थितीतच लग्न समारंभ होईल

५० पेक्षा अधिक लोक आढळल्यास परवानगी मागणाऱ्यावर कारवाई होणार

लग्न समारंभात सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक

दरम्यान, सुनीलने लवकरच वेब विश्वात पदार्पण करत आहे. सनफ्लॉवर या सीरिजमध्ये तो झळकणार असून सध्या या सीरिजचं चित्रीकरण सुरु आहे. ही सीरिज एप्रिल २०२१ मध्ये झी ५ वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2020 12:21 pm

Web Title: sunil grover shared tweet saying competition is going on to go to weddings too ssj 93
Next Stories
1 ऐतिहासिक… दिल्ली क्राईमची जागतिक स्तरावर दखल; पटकावला एमी पुरस्कार
2 ‘माझी किडनी फेल होत होती, जीवाला धोका होता’- राणा डग्गुबती
3 ‘माझे फोटो डिलिट करा’; ‘दंगल गर्ल’ झायराची चाहत्यांना विनंती
Just Now!
X