News Flash

जेव्हा लहान मुलांप्रमाणे मॅगी पाहून दुःखी होते सनी लिओनी, मजेशीर व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा हा व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीची प्रत्येक अदा निराळी असतेच. सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळ्या अंदाजात सक्रिय असल्यामुळे अभिनेत्री सनी लिओनी ही कायम चर्चेत असते. लॉकडाउनच्या काळात तर ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरीच सक्रिय राहते आणि चाहत्यांचे मनोरंजन करत असते. अभिनेत्री सनी लिओनीने नुकताच तिचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावरून शेअर केलाय. हा व्हिडोओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सनी लिओनी नेहमीच तिच्या अदा प्रेक्षकांना मोहित करत असतेच, पण या व्हिडीओमध्ये सनी लिओनीलाच मॅगीने घायाळ केलेलं दिसून येतंय.

अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये गरमा गरम वाफा निघत असलेल्या मॅगीकडे ती दुःखी चेहरा करून अगदी एकटक बघताना दिसून येतेय. अगदी लहान मुलांप्रमाणे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव दिसून येत आहेत. तिचा व्हिडीओ काढणाऱ्या महिलेला ती म्हणते, “तु माझा व्हिडीओ काढतेय का…?”. त्यावर ती महिला सनीला बोलते, “हो, कारण तू डाएटवर आहेस आणि तु मॅगी खाऊ शकणार नाहीस…”.

सनी लिओनी डाएटवर असल्यामुळे तिला मॅगी खाता आली नाही, म्हणून तिने गरम गरम मॅगीचा जो घमघमाट सुटला होता, त्याचा सुवास घेत घेत तिने मॅगीचा आस्वाद घेतला. अगदी सोज्वळ मुलीप्रमाणे तिचा चेहरा दुःखी झालेला पाहून नेटकऱ्यांनी तिच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 7:01 pm

Web Title: sunny leone smells maggi instead of eating it dieting is the reason prp 93
Next Stories
1 ‘डॅडी’ झाले आजोबा, नव्या पाहुणीचे झाले आगमन
2 ‘ससुराल सिमर का २’ मालिकेतील अभिनेता करोना पॉझिटिव्ह
3 शोकसभेत रडण्यासाठी चंकी पांडेला देण्यात आलेली ५ लाख रुपयांची ऑफर
Just Now!
X