27 September 2020

News Flash

सुशांत सिंह प्रकरण : फार्महाऊसवरील पार्ट्यांमध्ये सारा अली खानची उपस्थिती; मॅनेजरचा खुलासा

लोणावळ्याच्या फार्महाऊसवर नेमकं काय व्हायचं?; सुशांतच्या मॅनेजरने केला खुलासा

ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली रिया चक्रवर्ती हिला एनसीबीने अटक केली आहे. तसंच सध्या या प्रकरणी एनसीबी पुढील तपास करत असून या तपासाचा वेग वाढल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत या प्रकरणी अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंह या अभिनेत्रींची नाव समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच आता सुशांतच्या लोणावळा येथील फार्महाऊसवर अनेकदा पार्ट्या होत असून त्यात साराची बऱ्याच वेळा उपस्थिती असायची अशी माहिती ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी सुशांतच्या फार्महाऊसमध्ये स्टींग ऑपरेशन करण्यात आलं. यावेळी या फार्माहाऊसचा मॅनेजर रईस याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसंच येथे होणाऱ्या पार्ट्यांमध्ये अभिनेत्री सारा अली खान येत होती, असंही त्याने सांगितलं.

आणखी वाचा- रिया ड्रग्ज प्रकरण : सारा, रकुलसोबत बॉलिवूडमधील आणखी दोन प्रसिद्ध नावं चर्चेत

“सुशांतच्या या फार्महाऊसमध्ये बऱ्याच वेळा पार्ट्या होत असे आणि त्यात अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी व्हायचे. यात सारा अली खानदेखील असायची. सारानंतर रिया चक्रवर्तीदेखील अनेकदा यायची. सुशांतला कधीच ड्रग्स घेताना पाहिलं नव्हतं. पण त्या पार्ट्यांमध्ये स्मोकिंग पेपर कायम मागवले जायचे. आता ते का मागवले जायचे हे माहित नाही”, असं मॅनेजर रईसने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “एप्रिलमध्ये रियाचं फार्महाऊसवर येणं-जाणं वाढलं. ३१ एप्रिल रोजी या फार्महाऊसमध्ये एक बर्थ डे पार्टी करण्यात आली होती. त्यात रियाचे आई-वडीलदेखील सहभागी होते.तसंच सुशांत जेव्हा युरोप ट्रीपवरुन परत आले त्यानंतर त्याची तब्येत बिघडली होती. सुशांतच्या मृत्यूच्या तीन दिवसांपूर्वी त्याने आपल्या तिन्ही श्वानांच्या खर्चासाठी पैसेदेखील दिले होते”.

आणखी वाचा- ड्रग्स प्रकरण: लवकरच सारा अली खानला पाठवले जाऊ शकते समन्स

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणी आता कलाविश्वातील पार्ट्या आणि त्यातील ड्रग्स सेवन हा नवा मुद्दा समोर आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी आता कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी व्यक्त होताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 8:36 am

Web Title: sushant farmhouse revealtion sara came to sushant parties then came rhea ssj 93
Next Stories
1 कंगनाची दोन कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी
2 हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही ही चंद्र, सूर्याइतकीच लख्ख आहे-उर्मिला मातोंडकर
3 कंगनाने दादासाहेब फाळकेंचा उल्लेख बाबासाहेब केल्याने नेटकरी संतापले; म्हणाले ‘लाज वाटली पाहिजे…,’
Just Now!
X