अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. परिणामी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे रियावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही टीका अभिनेत्री हिना खानला आवडलेली नाही. तिने रियाला पाठिंबा देत टीकाकारांवर संताप व्यक्त केला आहे. “पुराव्यांअभावी अशी टीका करु नका त्यामुळे तिचं करिअर संपून जाईल”, असं मत हिनाने व्यक्त केलं आहे.
या टीव्ही अभिनेत्रीने नाकारली ‘बिग बॉस’ची कोट्यवधींची ऑफर; कारण…
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत हिनाने सुशांत मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं. ती म्हणाली, “सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यामुळे खरी माहिती बाहेर येईपर्यंत थोडी वाट पाहा. उगाचच अर्धवट माहितीच्या आधारावर रियावर टीका करु नका. जर तुम्हाला मतं मांडायचीच असतील तर तटस्थपणे मांडा. अशी आक्षेपार्ह टीका करु नका. अशा प्रकारच्या मीडिया ट्रायलमुळे रियाचं करिअर संपून जाईल. बोलण्यासाठी देशात करोना विषाणू, स्त्रीयांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, शिक्षण, भ्रष्टाचार असे अनेक विषय आहेत. त्यावर देखील व्यक्त व्हा.”
कंगना रणौतच्या लोकप्रियतेला उतरती कळा?; दिवसाला ५० हजार फॉलोअर्स करतायत अनफॉलो
सुशांत प्रकरणात आलं वेगळं वळण
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला. रियाने आजवर अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. मात्र तपासादरम्यान एनसीबीला रक्त किंवा अन्य चाचण्या आवश्यक वाटल्यास त्यासही ती तयार असल्याचे अॅड. मानेशिंदे यांनी सांगितले.
रियाच्या फोनमधून मिळवलेल्या चॅट्समध्ये ती सॅम्युअल मिरांडासोबत ड्रग्सविषयी चर्चा करत असल्याची समोर आली. रियाचे हे रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी डिलिट केले होते. यातील पहिल्या संभाषणात ती गौरव आर्यासोबत ड्रग्सविषयी बोलताना दिसत आहे. हे मेसेज ८ मार्च २०१७ चे आहेत. या चॅट्सविषयी खुलासा होताच सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने रियाविरोधात त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.