26 February 2021

News Flash

कंगनाला पोलिसांनी खरंच समन्स बजावले का? रंगोलीने सांगितलं सत्य

वाचा, नेमकं काय आहे प्रकरण

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून सुशांतने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांची चौकशी करण्यात आली असून अभिनेत्री कंगना रणौतचीदेखील चौकशी होणार असल्याची चर्चा रंगली होती. इतकंच नाही तर तिला पोलिसांनी याप्रकरणी नोटीसही दिली होती असं म्हटलं जात होतं. परंतु “पोलिसांनी कंगनाला कोणतीही नोटीस किंवा समन्स बजावले नसून कंगना स्वत: जबाब देण्यास तयार होती”, असं रंगोलीने म्हटलं आहे.

रंगोलीने तिचे आणि मुंबई पोलीस यांच्यातील संभाषणाचे काही स्क्रीनशॉट ट्विटवर शेअर केले आहेत. यात सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कंगना स्वत: तिचा जबाब नोंदवू इच्छित असल्याचं ती पोलिसांना सांगत असल्याचं दिसून येत आहे. परंतु, तिच्या मेसेजवर पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याचं रंगोलीने सांगितलं.

“कंगनाला पोलीस चौकशीसाठी कोणतीही कायदेशीर नोटीस किंवा समन्स बजावण्यात आले नाहीत. तसंच २ आठवड्यांपर्यंत पोलिसांचे फोन येत होते. परंतु, या प्रकरणी कंगनाला स्वत:ला तिचा जबाब नोंदवायचा आहे. मात्र पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये”, असं ट्विट रंगोलीने शेअर केलं आहे.

दरम्यान,सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली असून अभिनेत्री कंगना रणौतने कलाविश्वातील घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केले आहे. सुशांतने आत्महत्या केली नसून ही हत्या असल्याचं तिने म्हटलं आहे. त्यामुळे सध्या या मुद्द्यावरुन अनेक वाद आणि चर्चा कलाविश्वात रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 12:04 pm

Web Title: sushant singh rajput death case kangana ranaut wanted to record her statement to mumbai police police did not respond back ssj 93
Next Stories
1 #CandleForSSR म्हणत कंगनाने वाहिली सुशांतला श्रद्धांजली
2 प्रभाससोबत काम करण्यासाठी दीपिका घेणार आजवरचे सर्वाधिक मानधन?
3 करोना योद्धांसोबत रंगणार ‘होम मिनिस्टर घरच्याघरी’
Just Now!
X