‘सुशांतने आत्महत्या केली नाही, तर फजच्या पट्ट्याने त्याचा गळा आवळण्यात आला आहे’, असा संशय सुशांतचा एक्स असिस्टंट अंकित आचार्य याने व्यक्त केला आहे. ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत सुशांतने आत्महत्या केली नाही, तर त्याची हत्याच झाली आहे, असं वक्तव्य अंकितने व्यक्त केला आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्याचं दिसून येत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन धागे उलगडले जात आहेत. या प्रकरणाचा एकीकडे सीबीआय तपास सुरु आहे. तर दुसरीकडे सुशांतच्या जवळील व्यक्ती रोज त्याच्याशी निगडीत गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहेत. यात अंकितच्या वक्तव्याने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

”मला सुशांतचा स्वभाव चांगल्या पद्धतीने माहित होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली आहे, यावर मी विश्वास ठेऊच शकत नाही. ही आत्महत्या नसून हत्याच आहे. जर समजा आपण हे मान्य केलं की सुशांतने आत्महत्या केली. तर कोणीही आत्महत्या केल्यावर त्याच्या गळ्यावर U शेपचा आकार येतो. पण ज्यावेळी कोणी गळा दाबायचा प्रयत्न करतं त्यावेळी गळ्यावर O शेपचा आकार दिसून येतो. सुशांतच्या गळ्यावर सुद्धा O शेप होता”, असं अंकित म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “आत्महत्या केल्यावर डोळे आणि जीभ बाहेर येते. पण सुशांतचं तसं अजिबात झालं नव्हतं. त्यामुळे ही आत्महत्या नाही, हत्याच आहे. मी एक नक्की सांगू शकतो की त्याच्या गळ्यावर कोणत्या प्रकारच्या खूणा होत्या. या खूणा सुशांतच्या पाळीव श्वानाच्या फजच्या बेल्टच्या होत्या. माझ्याकडे सुशांतचे मृत्यूनंतरचे काही फोटो आहेत. हे फोटो पाहिल्यावर मला सतत जाणवतं की सुशांतच्या गुन्हेगाऱ्यांनी त्याचा फजच्या बेल्टने गळा आवळून खून केला आहे”.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची शुक्रवारी ईडीने चौकशी केली आहे. या चौकशी दरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर अनेक आरोप केल्यामुळे ही चौकशी झाली असून रियासोबत तिचे वडील आणि भाऊ यांचीही चौकशी झाली आहे.