News Flash

एकता कपूरला गुरू मानतो ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

कामाच्या बाबतीत तिने मला काहीही करायला सांगितले तर मी ते आनंदाने करेन

एकता कपूर

‘एम.एस.धोनी’, ‘केदारनाथ’, ‘सोन चिडिया’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम करणारा अभिनेता म्हणजे सुशांत सिंह राजपूत. सुशांतने छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या एकता कपूर निर्मीत मालिकेतून अभिनयाच्या दुनियेला सुरूवात केली आणि आज तो बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता झाला आहे. त्याने नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात निर्माती एकता कपूर सह टीव्ही असो किंवा डिजीटल माध्यम असो कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काम करण्याचे वक्तव्य केले आहे. सुशांतच्या या वक्तव्यामुळे तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

सुशांतने लेखिका नताशा मालपानीच्या ‘बाऊंडलेस’ पुस्तकाच्या प्रकाशना दरम्यान मीडियाशी संवाद साधला. त्या दरम्यान सुशांतला एक प्रश्न विचारण्यात आला की, जर तुला एकता कपूरसह पुन्हा काम करण्याची संधी मिळाली तर? त्यावर सुशांत म्हणाला की, ‘फक्त टीव्ही माध्यमातच का? मी तिच्या सह कोणत्याही प्लटफॉर्मवर काम करण्यास तयार आहे. माझ्या कुटुंबाव्यतिरिक्त मी माझ्या करिअरमध्ये एकता मॅडमला महत्वाचे स्थान देतो. जर कामाच्या बाबतीत तिने मला काहीही करायला सांगितले तर मी ते आनंदाने करेन.’

सध्या सुशांत दिग्दर्शक नितेश तिवारींच्या ‘छिछोरे’ चित्रपटात व्यग्र आहे. तसेच या चित्रपटात सुशांत सह अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून चित्रपट प्रदर्शनास सज्ज आहे. मी देखील या चित्रपटाच्या चित्रीकरणाची आतुरतेने वाट पाहात आहे’ असे सुशांतने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 11:59 am

Web Title: sushant singh rajput says if ekta kapoor tells me to do anything i will follow her
Next Stories
1 …म्हणून मी सिनेमांमधील नग्नता आणि किसिंग सीनपासून लांबच राहतो- सलमान खान
2 ‘संगीताकडे आलो नसतो तर क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी नक्कीच केली असती’
3 दिल..दोस्ती..शुभमंगल! सुव्रत-सखी अडकले लग्नाच्या बेडीत
Just Now!
X