मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं आहे. पालिकेच्या या कारवाईवर अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील या अन्यायाला राष्ट्रपती राजवटीनं उत्तर देता येईल का? असा सवाल तिने केला आहे.

अवश्य पाहा – ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्री संजना गलरानीला अटक

“हे देवा! हे तर एक प्रकारचं गुंडाराज आहे. अशा प्रकारचा अन्याय सहन केला जाऊ शकत नाही. महाराष्ट्रातील या अन्यायाला राष्ट्रपती राजवटीनं उत्तर देता येईल का? चला आपण पुन्हा एकदा राम राज्य प्रस्थापित करुया.” अशा आशयाचं ट्विट करुन श्वेता सिंह किर्ती हिने आपली नाराजी व्यक्त केली आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “अनधिकृत बांधकाम उभारलं तेव्हा कुठे होता?”; BMCच्या कारवाईवर दिया मिर्झा संतापली

महापालिकेकडून कंगनाला जुहू येथील कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. उत्तर देण्यासाठी कंगनाला २४ तासांची मुदत देण्यात आली होती. पण कंगनाकडून कोणतंही उत्तर न दिल्याने पालिकेकडून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली. महापालिकेकडून कारवाईसाठी बुलडोझरचाही वापर करण्यात आला. पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचे फोटो कंगनाने ट्विट करण्यात आले असून बाबरची सेना, पाकिस्तान, पाकिस्तानव्याप्त काश्मीर असे उल्लेख करण्यात आले आहेत. ही लोकशाहीची हत्या असल्याचंही तिने म्हटलं आहे.