१४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस याबाबत चौकशी करताना दिसत आहेत. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार सुशांत गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. केसरी चावडा यांची देखील चौकशी करण्यात आली. दरम्यान त्यांनी सुशांतच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.
मुंबई पोलिसांना चावडा यांनी गेल्या काही दिवसांपासून सुशांतला एक्स गर्लफ्रेंड आणि ‘पवित्र रिश्ता’ को-स्टार अंकिता लोखंडेपासून वगळे झाल्याचा पश्चाताप होत असल्याचे सांगितले. अंकितापासून लांब गेल्यावर थोडे दिवस सगळं काही ठिक होतं. पण त्यानंतर तो डिस्टर्ब झाला होता. त्यानंतर अभिनेत्री क्रिती सेनॉन सुशांतच्या आयुष्यात आली. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. सुशांतचे वागणे थोडे बदलले असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले. त्याला रात्री झोप येत नव्हती. त्याला वेगवेगळे आवाज येऊ लागले होते.
सुशांत आणि अंकिताने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’मध्ये एकत्र काम केले होते. या मालिकेत अंकिता त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. दरम्यान त्या दोघांमध्ये चांगले मैत्रीचे नाते होते. हळूहळू ते नाते नात्यामध्ये बदललं. जवळपास पाच वर्षे ते एकमेकांना ते डेट करत असल्याचे म्हटले जात होते. २०१३ मध्ये सुशांतने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
रविवारी, १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही.