News Flash

ह्रतिक रोशनची एक्स वाईफ सुझान खानचा नवा लूक; शेअर केला व्हिडीओ

या व्हिडीओमधल्या तिच्या ग्लॅमरस लूकवर कमेंट्स करत तिचे फॅन्सच नाही तर इतर सेलिब्रिटी सुद्धा कौतूक करताना दिसून येत आहेत.

(Photo:Instagram@suzkr)

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची एक्स वाईफ सुझान खान तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सुझान खान सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आलीय. नुकतंच तिने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तिने स्वतःची स्टाइल बदलली असल्याचं दिसून आलं. या व्हिडीओला पाहून तिने स्वतःचा मेकओव्हर केला की काय असंच दिसून येतंय. या व्हिडीओमधल्या तिच्या ग्लॅमरस लूकवर तिचे फॅन्स फिदा झाले आहेत. तिच्या नव्या लूकच्या व्हिडीओवर कमेंट्स करत तिचे फॅन्सच नाही तर इतर सेलिब्रिटी सुद्धा कौतूक करताना दिसून येत आहेत.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची एक्स वाईफ सुझान खान ही इंटेरिअर आणि फॅशन डिझायनर आहे. तिला स्वतःचे आऊटफिट्स स्वतःच डिझाइन करायला आवडतात. सुझानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती वेगळ्याच लूकमध्ये दिसून आली. बॉडीकॉन टॉप सोबतच स्प्लिट हाय थाय स्कर्ट, हाय हील्स मध्ये खूपच ग्लॅमरस दिसून येतेय. या व्हिडीओला आतापर्यंत १४ हजार पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

काही दिवसांपूर्वीच सुझान खानच्या कुटूंबात नवा पाहूणा आलाय. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत नव्या पाहूण्याचा परिचय करून दिला होता. या नव्या पाहूण्याचं नाव मलिबू खान आहे. तिच्या चाहत्यांनी सुद्धा या नव्या पाहूण्याचं दमदार स्वागत केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)


अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांना बॉलिवूडमधल्या क्यूट कपलमध्ये पाहिलं जात होतं. या दोघांनी १४ वर्षाचा संसार केल्यानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण तरीही ते दोघे त्यांची मुलं रेहान आणि रिदान यांच्यासाठी अनेकदा एकत्र आले आलेले दिसून आले. सुझान खान ही तिच्या स्टाइलीश अंदाजासाठी नेहमीच चर्चेत येत असते. सुझान खान ही बॉलिवूड अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 12:03 pm

Web Title: sussanne khan hrithik roshan ex wife new stylish look goes viral watch here latest video prp 93
Next Stories
1 सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; बायोपिकचा मार्ग मोकळा
2 ‘…तर त्यातून बाहेर पडणेच योग्य’, घटस्फोटावर मिनिषा लांबाचा खुलासा
3 राखीला किस ते दुबईमध्ये जेलची हवा, जाणून घ्या मिका सिंगच्या कॉन्ट्रोव्हर्सी
Just Now!
X