28 September 2020

News Flash

‘सूरमा’नंतर तापसी साकारणार ‘या’ खेळाडूची भूमिका

हा चित्रपट एका धावपटूच्या जीवनावर आधारित आहे

२०१८-१९ या वर्षभरामध्ये अनेक नवनवीन चित्रपटांचा धडाका सुरु असतानाच आता आणखी एक नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. ‘बेबी’, ‘पिंक’, ‘नाम शबाना’ यासारख्या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तापसी पन्नू या नव्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे ‘सूरमा’ या चित्रपटातून हॉकीपटूची भूमिका साकारणारी तापसी पुन्हा एकदा खेळाडूच्या रुपात प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर करुन तापसीने ही माहिती दिली.

तापसी लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटामध्ये झळकणार असून यात ती एका धावपटूच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट गुजरातच्या कच्छमधील धावपटू रश्मी हिच्यावर आधारित आहे. रश्मी हिच्या धावण्याच्या वेगामुळे तिला गावातील लोकांनी ‘रश्मी रॉकेट’ हे नावं दिलं. नुकतंच या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं असून या पोस्टरमध्ये तापसी रेसिंग ट्रॅकवर धावताना दिसत आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रुवाला करत आहेत. तर आकर्ष खुराणा चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

तापसीने हा फोटो शेअर करुन “ती हट्टी आणि निडर आहे. लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे”, असं कॅप्शन दिलं आहे. तर तिच्याप्रमाणेच अक्षयकुमारनेही हे मोशन पोस्टर शेअर केलं आहे.

“तापसीचं हे नवीन मिशन आहे, रश्मी रॉकेट. ज्याचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे रॉकेट त्याच्या पुढच्या मोहीमेसाठी तयार आहे. रश्मी रॉकेटमधील तापसीच्या भूमिकेची एक झलक”, असं कॅप्शन अक्षयने दिलं आहे.

दरम्यान, तापसी ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटासह ‘सांड की आँख’ या चित्रपटामध्येही झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेत्री भूमि पेडणेकर स्क्रीन शेअर करणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून जगातील सर्वांत वृद्ध महिला शार्पशूटर्सच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2019 8:36 am

Web Title: taapsee pannu looks rugged and edgy as an athlete in first motion poster for rashmi rocket ssj 93
Next Stories
1 उत्साह हवा, उपद्रव नको – शशांक केतकर
2 बोल्ड वेब सीरिज ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स २’मध्ये या अभिनेत्रीची एण्ट्री
3 शिवाजी महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा ‘हिरकणी’
Just Now!
X