आज ४ नोव्हेंबर रोजी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री तब्बूचा ४८ वा वाढदिवस आहे. वयाच्या १४ व्या वर्षी तब्बूने ‘हम नौजवान’ या पहिल्यावहिल्या चित्रपटात काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. या चित्रपटात देवानंद मुख्य भूमिकेत होते आणि त्यांच्या मुलीची भूमिका तब्बूने वटवली होती. आज तब्बूचे असे अनेक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते.
अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनात घर करणाऱ्या तब्बूने वयाची ४८ वर्षे ओलांडून गेली असली तरी विवाह केलेला नाही. मात्र एकेकाळी तब्बूच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून दाक्षिणात्य सुपरस्टार अक्कीनेनी नागार्जुन असल्याचे म्हटले जात होते. नागार्जुन आणि तब्बू यांनी बराच काळ एकमेकांना डेट केले असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
आणखी वाचा : वाह! नुसरत जहाँचा साडीतला फोटो बघून चाहत्यांची दाद
एका चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान नागार्जुन आणि तब्बूची ओळख झाली होती. दरम्यान दोघे ही ऐकमेकांच्या प्रेमात पडले. नागार्जुन आणि तब्बूचे रिलेशनशीप जवळजवळ १० वर्षे सुरु असल्याचे म्हटले जात आहे. पण त्यावेळी नागार्जुन विवाहित होता. त्याने तब्बूला स्वत:च्या घराजवळ घर घेऊन दिले होते. नागार्जुनला तब्बूसोबतचे रिलेशन कायम ठेवायचे होते आणि पत्नीसोबत घटस्फोटही घ्यायचा नव्हता. मात्र तब्बूला हे मान्य नव्हते. काही दिवसांमध्ये दोघांच्या रिलेशनशीपमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर तब्बूने नागर्जुनमुळे लग्नच केले नाही अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.