News Flash

‘हिट अँड रन’प्रकरणी तमिळ सुपरस्टार विक्रमच्या मुलाची अटकेनंतर सुटका

यामध्ये एक रिक्षाचालक जखमी झाला असून तीनही रिक्षांचं नुकसान झालं आहे.

vikram and his son druv
अभिनेता विक्रम आणि त्याचा मुलगा ध्रुव

तमिळ सुपरस्टार विक्रमच्या मुलाला हिट अँड रनप्रकरणी अटक करण्यात आली. विक्रम यांचा मुलगा ध्रुव चालवत असलेल्या गाडीने तीन रिक्षांना धडक दिली. यामध्ये एक रिक्षाचालक जखमी झाला असून तीनही रिक्षांचं नुकसान झालं. चेन्नईमधील रविवारी पहाटेची ही घटना असून निष्काळजीपणे गाडी चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी ध्रुवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेन्नईतील टीटीके मार्गावर रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रिक्षाचालक कमेशवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. तर अटकेत असलेल्या ध्रुवची नंतर वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.

ध्रुव मद्यपान करून गाडी चालवत नसल्याचं विक्रमच्या व्यवस्थापकाने स्पष्ट केलं. ‘रविवारी पहाटे मित्राच्या घरून परतताना ध्रुवच्या गाडीची धडक काही रिक्षांना लागली. यामध्ये एक जण जखमी झाला असून त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हा अपघात केवळ दुर्लक्षपणामुळे झाला असून यामागे इतर कोणतंही कारण नाही,’ असं व्यवस्थापक सूर्यनारायणन यांनी स्पष्ट केलं.

अपघाताचं नेमकं कारण काय होतं, याचा तपास पोलीस करत आहेत. ध्रुवने मद्यपान केलं नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं. अपघातावेळी त्याच्यासोबत गाडीत त्याचे दोन मित्रदेखील होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2018 11:51 am

Web Title: tamil superstar vikram son dhruv held for rash driving in chennai released on bail
Next Stories
1 ‘डेअर’ पडले महागात, मुलीशी असभ्य वर्तन करणाऱ्या मुलाचे शाळेतून निलंबन
2 स्वातंत्र्य दिनी जन धन खातेधारकांना मोदी सरकारकडून खास भेट
3 आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना हैदराबादमधून अटक
Just Now!
X