सोशल मीडियावर कंदील बलोच हे नाव गेल्या वर्षभरात बरंच चर्चेत राहिलं. तिच्या बोल्ड आणि वादग्रस्त व्हिडिओमुळे या चर्चांना आणखीनच उधाण आलं होतं. पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच हिची तिच्याच भावाकडूनच हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या मृत्युशी निगडीत बऱ्याच चर्चाही रंगल्या. मादक अदा आणि वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंदीलचं आयुष्य रहस्यमयी गाठोडच होतं. तिचं हेच आयुष्य पाकिस्तानी सीरिजमधून उलगडण्यात येणार आहे.

‘हिंदी मीडियम’ फेम अभिनेत्री सबा कमर यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कंदील बलोच मुळात कशी होती, तिला कोणत्या अडचणींचा सामन करावा लागता होता हे सर्व या सीरिजमधून सर्वांसमोर मांडलं जाणार आहे. ‘बाघी’ नावाच्या या उर्दू सीरिजचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘उर्दू १’ या वाहिनीवरुन ही सीरिज सर्वांच्या भेटीला येणार असून सबाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन टिझरचा व्हिडिओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/BWKn3lAAibu/

https://www.instagram.com/p/BWIYDZZADiy/

वाचा : ‘लगान’मधील ‘ती’ सध्या काय करते?

सोशल मीडियावर सर्वाधिक शोधण्यात येणाऱ्या १० मॉडेल्समध्ये कंदीलच्या नावाचा समावेश होता. यामागचं मुख्य कारण होतं, तिची वक्तव्य आणि बोल्ड व्हिडिओ असणाऱ्या पोस्ट. भारतातही कंदीलच्या नावाची चर्चा रंगण्याचं असंच एक कारण म्हणजे क्रिकेटर विराट कोहली. तिने विराटला जाहीरपणे प्रपोज करत अनेकांनाच धक्का दिला होता. पाकिस्तानची राखी सावंत म्हणूनही ती ओळखली जायची.