23 September 2020

News Flash

VIDEO : ‘तेरे बिना’ गाण्यात श्रद्धा आणि अंकुरचा रोमॅण्टिक अंदाज

हे गाणं सचिन- जिगरने संगीतबद्ध केलंय

श्रद्धा कपूर, अंकुर भाटिया

‘क्वीन ऑफ मुंबई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हसीना पारकरच्या जीवनावरील एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हसीना पारकर’ या चित्रपटातील एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. ‘तेरे बिना’ असं या गाण्याचं शीर्षक असून श्रद्धा कपूर आणि अंकुर भाटिया यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलंय.

यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरमध्ये हसीनाचं म्हणजेच श्रद्धाचं गंभीर रुप पाहायला मिळालं होतं. याविरुद्ध या गाण्यात श्रद्धा आणि तिचा ऑनस्क्रीन पती अंकुर भाटीयाचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळतोय. अरिजित सिंग आणि प्रियलच्या आवाजातील हे गाण्याला सचिन- जिगरने संगीतबद्ध केलंय. तर गाण्याचे बोल प्रिया सरैयाने लिहिले आहेत.

VIDEO: मतदार राजाला जागं करतोय ‘न्यूटन’चा हा सिद्धांत

श्रद्धाच्या याआधीच्या चित्रपटांपैकी ‘हसीना…’मधील तिचा लूक फार वेगळा असणार आहे. त्यासोबतच या भूमिकेसाठी तिनेही बरीच मेहनत घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती नाहिद खान करत असून, या चित्रपटातून दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत खुद्द श्रद्धाचा भाऊच झळकणार आहे. सिद्धार्थ कपूर आणि श्रद्धा कपूर ही बहिण- भावाची जोडीसुद्धा या चित्रपटातील प्रमुख आकर्षणाचा विषय ठरत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 7:03 pm

Web Title: tere bina song from haseena parkar released featuring shraddha kapoor and ankur bhatia
Next Stories
1 गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि किंग खानमध्ये रंगणार चर्चा
2 देवा, पावसाच्या तडाख्यापासून मुंबईला वाचव; कलाकारांचं गणरायाला साकडं
3 VIDEO: मतदार राजाला जागं करतोय ‘न्यूटन’चा हा सिद्धांत
Just Now!
X