25 February 2021

News Flash

…तर जेनेलियासोबत झालं असतं ब्रेकअप; रितेशने सांगितला मजेदार किस्सा

खरंच रितेश -जेनेलियाचं झालं असतं ब्रेकअप?

बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेली ही जोडी आज लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे लग्नाला बरीच वर्ष होऊन गेल्यानंतरही या दोघांमधील प्रेम कायम आहे. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगत असतात. विशेष म्हणजे सध्या या दोघांच्या ब्रेकअपची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. लग्नापूर्वी एकमेकांना डेट करत असताना रितेशने जेनेलियासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता, असं म्हटलं जात आहे.

सध्या सोशल मीडियावर रितेशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने जेनेलियासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता असं सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ कपिल शर्मा याच्या द कपिल शर्मा शो या रिअॅलिटी शोमधील असल्याचं पाहायला मिळत आहे.

एकमेकांना डेट करत असताना रितेशने गंमत म्हणून जेनेलियाला हे नातं संपुष्टात आणायचं आहे. त्यामुळे आपण ब्रेकअप करु असा मेसेज केला होता. विशेष म्हणजे रितेशचा हा मेसेज पाहिल्यानंतर जेनेलियाला ते खरं वाटतं. त्यामुळे तिने रितेशला चांगलंच खडसावलं. मात्र, या प्रकारानंतर अशी गंमत कधीच करणार नाही असं वचन रितेशने जेनेलिया दिलं.

दरम्यान, ‘तुझे मेरी कसम’या चित्रपटाच्या वेळी त्यांची पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांनी मस्ती या चित्रपटात एकत्र काम केलं आणि याचदरम्यान त्यांचं प्रेम खुलू लागलं. २०१२ मध्ये लग्न केलेली ही जोडी आजही एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात हे दिसून येतं. या दोघांना दोन गोंडस मुलंदेखील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 1:42 pm

Web Title: the kapil sharma show ritiesh deshmukh reveals he once as a prank texted genelia to break the relationship and this happened ssj 93
Next Stories
1 सुझानच्या फोटोवर हृतिकची कमेंट; दोघं पुन्हा येणार एकत्र?
2 होणाऱ्या पतीसोबत काजल अगरवालने शेअर केला फोटो
3 “संघर्ष करा किंवा घरी जा”; घराणेशाहीच्या वादात हार्दिक पांड्याच्या एक्स गर्लफ्रेंडची उडी
Just Now!
X