News Flash

नाव बदलल्यामुळे ट्रोल झालेल्या सोनमनं अखेर सोडलं मौन!

लग्नानंतर नावात बदल करण्यामागे एक कारण असल्याचे सांगत सोनमने याचा खुलासा केला आहे.

सोनम कपूर

बॉलिवूडमध्ये सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचा लग्नसोहळा विशेष गाजला. अगदी सोनमच्या मेहंदी समारंभापासून ते तिने परिधान केलेल्या लेहंग्यापर्यत. ही चर्चा इथेच न थांबता लग्नानंतरही त्या चर्चा सुरुच होत्या. लग्नानंतर सोनमने तिच्या नावात बदल केला त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं. मात्र लग्नानंतर नावात बदल करण्यामागे एक कारण असल्याचे सांगत सोनमने याचा खुलासा केला आहे.

अनिल कपूरची लाडकी लेक सोनम कपूर आता लग्नानंतर सोनम अहुजा झाली आहे. लग्नानंतर ‘सोनम कपूर – आहुजा’ असा बदल करणा-या सोनमने पुन्हा एकदा नावात बदल करत ‘सोनम के. आहुजा’ असे केले आहे. लग्नानंतर सोनमच्या नावातील हा बदल तिच्या चाहत्यांना फारसा रुचला नाही. त्यामुळे चाहत्यांनी सोनमवर टीकेची झोड उठविली होती. सोनम फेमिनिस्ट असल्याचा खोटा दावा करत असून प्रत्यक्षात तर ती कठोर रुढी-परंपरांचे पालन करते अशी टीका एका नेटक-याने केली होती. मात्र यावर प्रत्युत्तर देत सोनमने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

‘मी कायमच महिलांवर होणा-या अन्यायाचा निषेध करत आले असून मी स्त्रीवादी भूमिकेचे कायमच समर्थन करते. मात्र यावेळी मी स्वत:हून माझ्या नावात बदल केला आहे. नाव बदलण्यासाठी माझ्यावर कोणतीही जबरदस्ती करण्यात आलेली नाही, अशी माहिती ‘कान’ महोत्सवात पोहोचलेल्या सोनमने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली.

पुढे ती असंही म्हणाली, आनंदचा संख्याशास्त्रावर विश्वास आहे. त्यामुळे आनंद प्रत्येक निर्णय घेताना प्रसिद्ध संख्याशास्त्रतज्ज्ञ संजय जुमानी यांचा सल्ला घेतो. यावेळी देखील संजय जुमानी यांनी दिलेल्या सल्ल्यामुळेच नावात बदल करण्यात आला आहे. मात्र, माझ्या नावात बदल व्हावा ही माझीदेखील इच्छा होती. तसेच आनंदनेही स्वत: च्या नावात बदल केला आहे. आनंदने स्वत:च्या नावापुढे सोनमच्या नावातील ‘एस’ हा वर्णाक्षर जोडलं आहे. या खुलाशामुळे निदान आतातरी सोनमवर टीका होणार नाही अशी शक्यता वर्तविली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 12:02 pm

Web Title: the real story behind sonam kapoor name change
Next Stories
1 ..म्हणून नेहासाठी ‘हा’ दागिना आहे खूपच खास  !
2 VIDEO : व्हॉलीबॉल खेळताय?, तर खिलाडी कुमार होऊ शकतो तुमच्या संघात सामील
3 Mecca Masjid Bomb Blast Verdict: मक्का मशिद बाँबस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंदसह पाच आरोपी दोषमुक्त
Just Now!
X