News Flash

‘द रिंग’च्या सेटवर किंग खान आणि अब्रमामची धमाल

अब्रामच्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे

शाहरुख मुलगा अब्रामसोबत

शाहरुख सध्या जिथे जिथे जातो तिथे आपल्या मुलाला अब्रामला घेऊन जातो. यामुळे तो जास्तीत जास्त वेळ त्याच्याबरोबर घालवत आहे. मुलाबरोबर मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडिओ किंग खान सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. आता अब्रामच्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ‘द रिंग’ सिनेमाच्या सेटवर शाहरुख आणि अब्राम मस्ती करताना दिसत आहेत.

या व्हिडिओमध्ये शाहरुख आपल्या कामातून वेळ काढत सेटवरच अब्रामसोबत मस्ती करताना दिसत आहे. दोघंही एकमेकांनी फुग्यांनी मारताना दिसत आहेत. त्या दोघांची ही मस्ती बघून सेटवरचेही त्यांच्याकडे कौतूकाने पाहत आहेत.

दरम्यान शाहरुख आणि अब्रामचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात दोघांनीही स्पायडर मॅनचे मुखवडे घातले होते. शाहरुख लाल स्पायडर मॅन बनला होेता तर छोटा अब्राम काळ्या स्पायडर मॅन बनला होता. त्यांच्यातली मस्ती शाहरुखच्या फॅन्सना नक्कीच आवडलीा असणार यात काही शंका नाही. त्याने आतापर्यंत अब्रामचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबूक अशा सोशल मीडिया साइट्सवर शेअर केले आहेत.

सध्या शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा इम्तियाज अलीच्या आगामी ‘द रिंग’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच या सिनेमाचे प्रागमध्ये चित्रिकरण संपले. शाहरुखने प्रागमध्ये असतानाचे काही फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केले. ‘द रिंग’ सिनेमामुळे शाहरुख आणि इम्तियाज अलीला पहिल्यांदा एकत्र काम करण्याची संधी मिळालीय. यात शाहरुख एका टूरिस्ट गाइडच्या भूमिकेत दिसेल. याशिवाय त्याचे ‘डियर जिंदगी’ आणि ‘रईस’ हे सिनेमेही लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 5:15 pm

Web Title: this video of shahrukh khan playing with abram is just too adorable
Next Stories
1 सलमान राहतं घर सोडणार?
2 ..आलियासोबत काम करण्यास या अभिनेत्याचा स्पष्ट नकार
3 श्रीदेवी तिच्या मुलीला ठेवतेय प्रसारमाध्यमांपासून दूर..
Just Now!
X