अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली आहेत. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री टिया वाजपेयी हिने प्रतिक्रिया दिली. तिने स्वत:ची ड्रग्ज टेस्ट करुन त्याचा रिपोर्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या रिपोर्टच्या माध्यमातून तिने बॉलिवूडला पाठिंबा दिला आहे.
“मला सैराट २ मध्ये काम करायला आवडेल”; बॉलिवूड अभिनेत्रीला करायचंय मराठी चित्रपटांमध्ये काम
टियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने आपल्या ड्रग्ज टेस्टचा रिपोर्ट चाहत्यांना दाखवला आहे. “सिनेसृष्टीत काम करणारे काही मोजके लोक अंमली पदार्थांचं सेवन करत असतील. परंतु त्यामुळे संपूर्ण बॉलिवूडला दोषी समजणं योग्य नाही. बॉलिवूड कलाकारांवर खोटे आरोप केले जातायेत. त्यामुळे टीकाकारांच्या समाधानासाठी मी स्वत:ची ड्रग्ज टेस्ट केली आहे. हा पाहा माझा रिपोर्ट. कृपया सर्व कलाकारांना एकाच तराजुमध्ये तोलू नका. काही जण खरोखरच प्रामाणिकपणे काम करत आहेत.” अशी विनंती तिने या व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.
‘ड्रग्जचा विरोध करणाऱ्याला बॉलिवूडमध्ये बहिष्कृत केलं जातं’; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीच्या एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत. जया साहाच्या केलेल्या चौकशीदरम्यान एनसीबीनं चॅटवरील माहितीवरून ती सेलिब्रिटींसाठी सीबीडी ऑईल कुठून मागवते याची विचारणा केली. तसंच चॅटमधील अमित आणि SLB या नावांबद्दलही चौकशी केली. जयाच्या मोबाईलमधीड परत मिळवण्यात आलेल्या डेटामधून आणखी एक गौप्यस्फोटही झाला आहे.