News Flash

कोरिअन भयपटात अनुराग कश्यपचं म्युझिक; ट्रेलर पाहून तुम्हालाही भरेल धडकी

अनुराग कश्यपच्या म्यूझिकवर झॉम्बींचं आगमन; काही तासांत ट्रेलरला मिळाले लाखो व्हूज

‘ट्रेन टू बुसान’ या भयपटानं काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगात धुमाकूळ घातला होता. या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘पेनिनसुला’ असं आहे. नुकताच या थरारक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. लक्षवेधी बाब म्हणजे या कोरिअन चित्रपटाचा ट्रेलर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपमुळे भारतातही चर्चेत आहे. कारण या ट्रेलरमध्ये अनुरागच्या एका चित्रपटातील बॅकग्राऊंड म्युझिक वापरण्यात आलं आहे.

अवश्य पाहा – ‘रेप सीन पाहून आईनं घरातून बाहेर काढलं होतं’; रंजीत यांनी सांगितला थक्क करणारा अनुभव

‘पेनिनसुला’ हा एक झॉम्बींवर आधारित असलेला भयपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही कलाकार या झॉम्बींशी दोन हात करताना दिसत आहेत. हा सीन आणखी चांगल्या पद्धतीने उठून दिसावा यासाठी निर्मात्यांनी अनुराग कश्यपच्या ‘अग्ली’ चित्रपटातील बॅकग्राऊंड म्यूझिक वापरलं आहे. विदेशी चित्रपटातील हे देसी म्यूझिक भारतीय प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचं दिसत आहे. काही तासांत एक लाखांपेक्षा अधिक भारतीय प्रेक्षकांनी या कोरिअन चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीने पाळल्या ८० हजार मधमाशा; कारण वाचून व्हाल थक्क

‘ट्रेन टू बुसान’ हा भयपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. संपूर्ण शहरात एक व्हायरस पसरतो. या व्हायरसमुळे माणसांचं रुपातर झॉम्बींमध्ये होते. शहरातील काही झॉम्बी बुसान येथे जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये घुसतात. या झॉम्बींशी ट्रेनमधील प्रवासी कसा मुकाबला करतात हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. थरारक दृश्य, जबरदस्त अभिनय आणि चकित करणारे व्हीएफएक्स यामुळे ‘ट्रेन टू बुसान’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाची पुढील कथा ‘पेनिनसुला’ या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 1:24 pm

Web Title: train to busan sequel peninsula anurag kashyap ugly music mppg 94
Next Stories
1 …म्हणून आर्या आंबेकरसाठी खास आहे ‘ही’ साडी
2 फटाक्यांच्या पॅकेट्सवर परिणीतीचे फोटो; ‘इकोफ्रेंडली दिवाळी’ म्हणणारी अभिनेत्री होतेय ट्रोल
3 ‘मी दृष्ट काढते…’; दिवाळीनिमित्त आशा भोसले यांची खास पोस्ट
Just Now!
X