01 October 2020

News Flash

‘तुला पाहते रे’ मालिका महिन्याभरात घेणार प्रेक्षकांचा निरोप

सुबोध भावेची 'लोकसत्ता ऑनलाइन'ला माहिती

'तुला पाहते रे'

छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका ‘तुला पाहते रे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत नुकतीच राजनंदिनी या भूमिकेची एण्ट्री झाली. त्यानंतर कथेत कोणतं रंगतदार वळण येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. मात्र आता ही मालिका लवकरच संपणार असल्याची माहिती खुद्द सुबोध भावेनं दिली आहे.

‘येत्या जुलै महिन्यापर्यंत ही मालिका संपणार आहे. मालिकाची कथा एवढीत होती. त्यात उगाच ओढून ताणून खतपाणी घालून कथा वाढवणार नाही हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे काही रंगतदार वळणांनंतर जुलैपर्यंत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल’ अशी माहिती सुबोधनं ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिली.

मालिकेत सुबोधने साकारलेली विक्रांत सरंजामेची भूमिका आणि गायत्रीने साकारलेली इशा निमकरची भूमिका प्रेक्षकांना कायम लक्षात राहील. वय विसरायला लावणाऱ्या विक्रांत-इशाच्या प्रेमकहाणीने तरुणाईलाही वेड लावलं. गायत्रीने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि पदार्पणातील तिच्या या भूमिकेने खूप लोकप्रियता मिळवली. आता मालिकेचा शेवट कसा करण्यात येईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2019 11:59 am

Web Title: tula pahate re marathi serial to end soon subodh bhave gayatri datar
Next Stories
1 Bharat Movie Review : प्रेक्षकांची नजर खिळवून ठेवणारा ‘भारत’
2 सलमानचा ‘भारत’ पाहून चाहते म्हणतात…
3 Photos : उंच भरारीनंतर रसिका सुनीलची आता पाताळाला गवसणी
Just Now!
X