मराठी मालिकांच्या गेल्या आठवड्यातील टीआरपीची यादी जारी करण्यात आली आहे. १३ जुलै ते १९ जुलै या कालावधीत कोणत्या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि कोणत्या मालिकेची लोकप्रियता थोडीफार घसरली हे या यादीतून स्पष्ट होत आहे. गेल्या आठवड्यात ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेला मागे टाकलं आहे.
राजा राजगोंडा म्हणून झालेली राणा दाची एण्ट्री प्रेक्षकांना फारच आवडलेली दिसून येत आहे. म्हणूनच या मालिकेने टीआरपीच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. तर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा कॉमेडी शो आधीच्या आठवड्यात टॉप पाचमधून बाहेर पडला होता. आता पुन्हा एकदा या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. टीआरपीच्या यादीत या मालिकेने तिसरं स्थान मिळवलं आहे.
Video : ‘आली ठुमकत नार लचकत’; रिंकू राजगुरूच्या जबरदस्त परफॉर्मन्सची झलक
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेची टीआरपीच्या यादीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आधी तिसऱ्या क्रमांकावर असलेली ही मालिका आता चौथ्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. तर दुसरीकडे सुबोध भावेच्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेने पाचवं स्थान मिळवलं आहे. या मालिकेचा हा शेवटचा आठवडा होता.