News Flash

वरुण आणि नताशाने दिला एक लाखांचा मदतनिधी

अरुणाचल प्रदेशातल्या आगीमुळे नुकसान झालेल्यांना केली मदत

अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांनी अरुणाचल प्रदेशात तिरप आणि लाँगलिएँग जिल्ह्यात लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्यांच्या मदतीसाठी १ लाख रुपयांचा मदतनिधी दिला आहे. वरुण सध्या चित्रपटाच्या चित्रीकऱणासाठी त्या राज्यात आहे.

वरुण आपला आगामी चित्रपट भेडिया यासाठी अरुणाचल प्रदेशात चित्रीकरण करत आहे. अमर कौशिक हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. वरुणने हा मदतनिधी उपजिल्हाधिकारी सोमचा लोवांग यांच्याकडे सुपुर्द केला. सोमचा यांच्यावर तिरप इथल्या लोकांच्या मदतकार्याची जबाबदारी आहे.

माहिती मिळत आहे की, कमीतकमी दोन व्यक्तींचा या आगीत सापडून बळी गेला आहे. यात एका ६ वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. मार्चमध्ये लाँगलिएँग जिल्ह्यात आग लागली होती. त्यात परिसरातील अनेक घरेही जळाली आहेत.

वरुण आणि नताशा या दोघांचे सोमचा यांच्यासोबतचे फोटो डिप्रो झिरो या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत. वरुण आणि नताशासोबतच अभिनेत्री क्रिती सेनन, अभिषेक बॅनर्जी, अमर कौशिक आणि भेडिया या चित्रपटाच्या टीमचेही फोटो आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 7:27 pm

Web Title: varun dhavan and his wife donated one lakh rupees for arunachal pardesh vsk 98
Next Stories
1 जनता विरुद्ध इंदिरा गांधी; एकता कपूरची नवी घोषणा
2 नेटफ्लिक्सलाही करोनाचा फटका! प्रदर्शनासाठी नव्या सीरिजचा तुटवडा?
3 ‘या सगळ्या गोष्टी सोप्या नाही,’ ४० व्या वर्षी आई होणाऱ्या किश्वरने सांगितला गरोदरपणाचा अनुभव
Just Now!
X