News Flash

जॅकलिन फर्नाडिस आणि वरुण धवन पहिल्यांदाच एकत्र

‘रॉय’नंतर जॅकलिन फर्नाडिसची बॉलीवूड गाडी वेगाने धावू लागली आहे.

| April 14, 2015 06:15 am

‘रॉय’नंतर जॅकलिन फर्नाडिसची बॉलीवूड गाडी वेगाने धावू लागली आहे. जॅकलिनने आगामी ‘डिशूम’ या चित्रपटावर काम सुरू केले असून या चित्रपटात ती पहिल्यांदाच वरुण धवनबरोबर काम करते आहे. जॅकलिन आणि वरुण या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी अबुधाबीला रवाना झाले आहेत. या चित्रपटात वरुणबरोबर जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहे. जॅकलिनने याआधी ‘रेस’ चित्रपटात जॉन अब्राहमबरोबर काम केलेले असल्याने पुन्हा एकदा त्याच्याबरोबर काम करणे आनंदाचे आहे, असे जॅकलिनने सांगितले.
‘सॅमसंग’च्या गॅलॅक्सी एस सिक्स आणि गॅलॅक्सी एस सिक्स एजचे अनावरण जॅकलिन फर्नाडिसच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
सध्या तिची चित्रपटांची गाडी बॉलीवूडमध्ये स्थिरावली असल्याने ती प्रचंड खूश आहे. जॅकलिनने करण जोहरच्या ‘ब्रदर्स’चे चित्रीकरण पूर्ण केले आहे आणि आता वरुणबरोबर तिने ‘डिशूम’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अबुधाबीला होणार असल्याने जॅकलिनला तिच्या कु टुंबीयांना भेटणे सहज शक्य होणार आहे. जॅकलिनचे कुटुंब सध्या बहारिनमध्ये वास्तव्याला आहे. त्यामुळे चित्रीकरणातून वेळ काढून त्यांना भेटायला मिळणार असल्याने जॅकलिनचा आनंद द्विगुणित झाला आहे.
वाढत्या चित्रपटांबरोबर हिंदी भाषेवर मेहनत घेण्याची तिची गरजही वाढते आहे. सध्या मी खूप प्रामाणिकपणे हिंदीचे धडे गिरवते आहे. रोहित धवन दिग्दर्शित ‘डिशूम’ या चित्रपटात मला खूप अवघड हिंदी संवाद म्हणायचे आहेत. त्यामुळे हिंदीचे क्लासेस जोरात सुरू असल्याचे जॅकलिनने सांगितले. साजिद नाडियादवाला यांची निर्मिती असलेला ‘डिशूम’ हा जॅकलिनचा चित्रपट पुढच्या वर्षी १६ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2015 6:15 am

Web Title: varun dhawan and jacqueline fernandez to shoot a song in abu dhabi
Next Stories
1 इरफान निघाला बुडापेस्टला…
2 बहीण अर्पिताबरोबर सलमान खानची उदयपूरमध्ये ‘बोट राईड’
3 पाहा: गायक मिका सिंगने डॉक्टरच्या लगावली श्रीमुखात!
Just Now!
X