News Flash

सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला धक्का , नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

जया बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यामुळे अनेक वेळा त्या सोशल मीडियावर ट्रोल देखील झाल्या आहेत. असेच काही तरी जया बच्चन यांच्यासोबत पुन्हा एकदा घडले आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणूक सुरू आहेत. तर TMC पक्षासाठी प्रचार करताना जया बच्चन दिसल्या. त्या प्रचार रॅलीमधला त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जया बच्चन या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी प्रचारात सहभागी झाल्या होत्या. त्या रॅलीतला हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत जया बच्चनसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चाहत्याला धक्का मारुन त्यांनी खाली ढकललं. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमुळे जया बच्चन यांना ट्रोल केले जात आहे. एक नेटकरी म्हणाला, “ही खडूस बाई कायम रागातच असते.” दुसरा म्हणाला, “या बाईला काहीच येत नाही, अभिनयपण नाही, नेतृत्त्व तर मुळीच नाही, संयम नाही. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनला जया बच्चनची लाज वाटली पाहिजे.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “जनतेशी संपर्क ठेवायचा नाही तर प्रचारसभेत येता कशाला? ही बाई कायम लोकांचा अपमान करते.” अशा आशयाचे ट्विट करत नेटकरी जया बच्चन यांना ट्रोल करत आहेत. या ट्रोलिंगवर जया बच्चन यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 11:48 am

Web Title: video of jaya bachchan brutally smacking a fan who tried to click a selfie during howrah rally goes viral dcp 98
Next Stories
1 “आता याला कोणती फॅशन म्हणतात ?”, या व्हिडीओमुळे उर्वशी रौतेला ट्रोल
2 “..आणि ही दुसऱ्यांना शिकवते”; मास्क न घातल्याने सारा अली खान ट्रोल
3 मराठी चित्रपटनिर्मिती व्यवसाय अर्थविवंचनेत 
Just Now!
X