News Flash

‘मी स्वयंपाक का शिकला पाहिजे’, लिंगभेदावर विद्या बालन संतप्त

विद्याने एका मुलाखतीत तिला ही लिंगभेदाचा सामना करावा लागला असे सांगितले आहे.

vidya balan have faced gender bias
विद्या बालनने लिंगभेदाजा सामना केला आहे. (Photo Credit : Vidy Balan Instagram)

अभिनेत्री विद्या बालन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्याने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. काही दिवसांपूर्वी विद्या तिच्या वजनावर आणि प्रेग्नेंसीवर सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नामुळे चर्चेत आली होती. दरम्यान, डिनर टेबलवर लिंगभेदाचा सामना करावा लागला असे वक्तव्य विद्याने केले आहे. विद्याला जेवण बनवता येत नसल्याने कशा प्रकारे लोकांनी तिला सुनावले होते ते सांगितले आहे.

आणखी वाचा : “चाहत्यांकडून पहिल्यासारखे प्रेम मिळत नाही..”, अमिताभ यांनी व्यक्त केली खंत

एका मुलाखतीत विद्याने हा खुलासा केला आहे. “मला वाटतं आपण सगळ्यांनीच लिंगभेदाचा सामना केला आहे. फक्त स्त्री विरुद्ध पुरुष असाच नाही, तर स्त्रियांकडून स्त्रियांना किंवा पुरुषांकडून पुरुषांना देखील तशी वागणूक दिली जाते. मला असंही वाटतं की आपण सगळेच एकमेकांबद्दलचं मत बनवत असतो. इतरांना जज करणं हे महिलांच्या बाबतीत जास्त प्रमाणात होतं. अर्थात, मलाही लिंगभेदाचा सामना करावा लागला आहे. मला त्या वेळी राग आला, पण मी डोकं शांत ठेवलं. आताशा हे कमी झालं आहे. पण तरीही होतं हे मात्र खरं,” असं विद्या म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

ती पुढे म्हणाली, “मला आठवण आहे एकदा जेवताना मला अनेक लोक सांगत होते की देवा, तुला स्वयंपाक करता येत नाही. मी म्हणाली, सिद्धार्थ आणि मला दोघांनाही स्वयंपाक करता येत नाही. ते म्हणाले, पण स्वयंपाक कसा करतात हे तुला माहित पाहिजे..माझ्यासाठी आणि सिद्धार्थसाठी ते वेगळं का असलं पाहिजे?

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

आणखी वाचा : “शिल्पामुळे आमचं लग्न मोडलं..”, पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या आरोपांवर राज कुंद्राने सोडलं मौन

जेव्हा विद्याला तिची आई स्वयंपाक कसं बनवतात हे शिकायला सांगायची याबद्दल तिने पुढे सांगितलं आहे. “मी म्हणायची की का म्हणून मी जेवण बनवायचं शिकलं पाहिजे, मी एवढे पैसे कमवेन की जेवण बनवायला मी एका स्वयंपाकीला ठेवेन.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 6:01 pm

Web Title: vidya balan was told she should know how to cook even if husband siddharth roy kapur did not either dcp 98
Next Stories
1 पहिल्या पत्नीच्या अफेअर विषयी बोलायला नको होते; राज कुंद्रावर शिल्पा नाराज
2 ‘जून’ चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित
3 …म्हणून ऐश्वर्याने करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाला दिला होता नकार